Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

विविधोद्देशीय ग्रामीण कृषी संघातर्फे मृतांच्या वारसांना मदतीचे धनादेश

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संघाच्या सभागृहात संघाचे दिवंगत सभासद शिवलिंग ऐदमाळे आणि महादेव मडिवाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना एस.ए.एस. विमा कंपनीतर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर झाले होते. त्या विमा धनादेशांचे वितरण कुटुंबीयांना शुक्रवारी (ता.२६) करण्यात आले. संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

सदलग्यातील मोहरम एक सर्वव्यापी उत्सव

  सदलगा : येथील ग्रामदैवत हजरत ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब शमनामीरच्या भव्य आणि प्रशस्त दर्गा परिसरात सदलगा शहरातील तसेच उपनगरांतील पीर-पंजे तथा नालसाब भेटीच्या शेवटच्या दिवसांचा मोहरमचा कार्यक्रम अतिशय उत्साहात, रणहलगी, झांज,  ढोल ताशाच्या  दणदणाटात साजरा झाला. प्रमुख दर्गा, दर्गा चौक, गांधी रोड वरील मोठ्ठा मठ, लहान मठ येथील अर्ध चंद्राकृती …

Read More »

काळाच्या पाऊलखुणा: म. मं. ताराराणी कॉलेजमध्ये ई-निवडणुकीचा ‘डिजिटल पॅटर्न’ विद्यार्थिनींनी अनुभवली लोकशाहीची आधुनिक ताकद!

  खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात दि. १९ जून रोजी पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा यासाठी ‘EVM Simulator App’ चा वापर करण्यात आला. या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रा. जयश्री शिवटनकर मॅडम यांच्या …

Read More »

दिवंगत रावसाहेब पाटील यांचे कार्य प्रेरणादायी

  माजी मंत्री वीरकुमार पाटील; बोरगावमध्ये अभिवादन निपाणी (वार्ता) : सहकार रत्न दिवंगत रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देत होते. त्यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक सहकारी संस्था सक्षम झाल्या आणि शेतकऱ्यांना विकासाची …

Read More »

हेस्कॉमच्या खाजगीकरणासह इतर मागण्यासाठीचे रयत संघटनेचे आंदोलन आश्वासनानंतर स्थगित

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्याला विरोध करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या बंगळूर येथील फ्रीडम पार्क मध्ये दोन दिवस आंदोलन करण्यात आले. याशिवाय …

Read More »

सेल्फी ठरली जीवघेणी; कावेरी नदीत एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाचा बुडून मृत्यू

  बंगळूर : कावेरी नदीच्या काठावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिला आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या कारचालकाचा बुडून मृत्यू झाला. मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी तालुक्यातील मुत्तती येथे बुधवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये विजयम्मा (५०), श्वेता (३८), प्रियंका (२८), चैत्रा (२०) आणि कारचालक महेश (सर्व …

Read More »

बेंदूर सणानिमित्त बोरगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जनावरांचे प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक बेंदूर सणानिमित्त बोरगाव येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सुनील नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव येथे सोमवारी (ता. २९) जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध गटासाठी आकर्षक बक्षीसे देण्यात येणारअसल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तात्यासाहेब बसन्नावर यांनी दिली. बोरगाव येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बसन्नावर म्हणाले, …

Read More »

अन्नभाग्य योजनेत मोठा बदल; 13 लाखांहून अधिक अपात्र लाभार्थ्यांवर गंडांतर!

  बेंगळुरू : राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत आता अन्नभाग्य योजनेवरही सरकारची करडी नजर पडली आहे. गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजनांमध्ये सुधारणा केल्यानंतर सरकारने अन्नभाग्य योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 13 ते 14 लाख अपात्र बीपीएल कार्डधारकांना यादीतून हटविण्याची तयारी सुरू झाली आहे. अन्न …

Read More »

राज्यातील पालकमंत्र्यांची नियुक्त्या; सतीश जारकीहोळी यांच्याकडे तीन जिल्ह्यांची जबाबदारी

  बेंगळुरू : राज्यातील विकासकामांना गती देणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासनाशी प्रभावी समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्र्यांना विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. राजधानी बेंगळुरूसह राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी वरिष्ठ मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड …

Read More »

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चारा पाण्याच्या शोधात मेंढपाळांचे कुटुंबीयांसह स्थलांतर सुरू

  निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना कुटुंबासह भटकंती करावी लागत असून चारा उपलब्ध होईल तेथे शेतात तात्पुरता मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल होत असला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झालेला …

Read More »