Wednesday , August 26 2026
Breaking News

मुस्लिम समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील ; मुस्लिम समाजातर्फे सत्कार समारंभ

निपाणी (वार्ता) : सध्या समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून राजकारण सुरू आहे. त्यामुळे समाजासह गावांचा विकास खुंटला आहे. अशा गोष्टींना फाटा देऊन सर्व समाजाच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित घेऊन शहराचा विकास सुरू आहे. या पुढील काळातही नागरिकांनी सहकार्य करून गावचा विकास साधावा, असे आवाहन सहकारत्न उत्तम पाटील यांनी केले.
नगराध्यक्ष पदानंतर उपनगराध्यक्ष पदासारखे महत्त्वाचे पद मुस्लिम समाजाला मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
दुसऱ्या सत्रातील उपनगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. यापूर्वी या पदावर भारती वसवाडे यांची निवड झाली होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर झालेल्या निवड प्रक्रियेत मुस्लिम समाजातील नगरसेविका रुक्साना बाळासाहेब अफराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्या बिनविरोध उपनगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यामुळे त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.निवडणुकीच्या काळात उत्तम पाटील यांनी मुस्लिम समाजालाही योग्य प्रतिनिधित्व मिळवून देऊ असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी कृतीतून पाळला. मुस्लिम समाजाला नगर पंचायतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे समाजात बांधवांमध्ये
समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमास सिकंदर अफराज, पिंटू माळी, फारुख मुजावर, बाळू अफराज, बाशू अफराज, रफिक अफराज, सलीम अफराज, खाजा मकानदार, इरफान मकानदार, मोशीन मकानदार, हिम्मत अफराज, यांच्यासह मुस्लिम समाज उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

नगरपालिका प्रशासनाचे पीओपीबाबत वराती मागून घोडे

Spread the love  ७० टक्के मूर्ती तयार ; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *