Wednesday , August 26 2026
Breaking News

असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सतर्फे १५० बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स आणि महात्मा गांधी रुग्णालय यांच्या संयुक्त सहकार्याने कामगार दिनानिमित्त बांधकाम क्षेत्रातील कामगार व कंत्राटदारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. व्हनशेट्टी पार्कमधील बी. आर. पाटील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात १५० कामगार, कंत्राटदारांची तपासणी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन झाले. उपाध्यक्ष धनंजय खराडे यांनी स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष अमित रामनकट्टी यांनी प्रास्ताविकात संघटनेकडून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे सुभाष भाटले म्हणाले, दैनंदिन कामाच्या व्यापात बांधकाम कामगारांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. आरोग्यासाठी वेळ देता येत नसल्याने विविध आजार उद्भवतात. कामगारांची सुरक्षितता व त्यांचे आरोग्य लक्षात घेऊन असोसिएशन राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. महात्मा गांधी रुग्णालयातीलआनंद न्हावी यांनी रुग्णालयाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली.
यावेळी अभियंते अजय माने, सुदेश बागडी यांच्यासह उपस्थितांनी कामगार दिनाचे महत्व सांगून कामगारांना शुभेच्छा दिल्या. शिबारात कामगारांना धनुर्वात लसीकरणासह बी.पी., शुगर व अन्य तपासण्या करण्यात आल्या.
शिबीरावेळी सचिव अनुप पाटील, सहसचिव अभिजीत जिरगे, खजिनदार ओमकार वरुटे, इंजिनीयर अजित नरके
दीपक माने, काकासाहेब मगदूम, उमेश खोत, युवराज खोत, कैलास कलकवडे, अमित तांदळे, अमर सुतार, युवराज मातीवडर, ओमकार सुतार, नितीन रामनकट्टी यांच्यासह असोसिएशनचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *