Wednesday , August 26 2026
Breaking News

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी श्री. मजूकर यांनी कान्स्टंट टिनोपालचा पाडाव या ऐतिहासिक घटनेचे तपशीलवार वर्णन केले तर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक परशुराम पुजेरी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाची काळजी घेण्यासाठी पोलीस खात्याने आखलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच दोन गाणी गाऊन सुप्त गुणांचे दर्शन उपस्थितांना घडविले.
अनंत सावंत यांनी प्रार्थना सादर केली. तर रविंद्रनाथ व स्नेहलता जुवळी, अश्विनी पाटील, भारती गावडे, सुरेन्द्र व योगिनी देसाई, अशोक कदम, विजय वाईगडे, विजय बांदिवडेकर, प्रभाकर देसाई, राजेंद्र कर्नाटकी, वसंत पाटील व विजयमाला पाटील यांनी मराठी, हिंदी व कन्नड गाणी सादर केली तर भरत गावडे व चंद्रशेखर गायकवाड यांनी कविता सादर केली.
सुरेन्द्र देसाई यांनी स्वागत केले तर आभार शिवराज पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *