Wednesday , August 26 2026
Breaking News

चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन उद्यापासून

Spread the love

 

बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
२०२३ रोजी साली नुतन मंदिरची वास्तू शांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या होता. त्यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने व ग्रामस्थांनी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस म्हणजेच चार आणी पाच या तारखेला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला होता त्या अनुषंगाने दरवर्षी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. महिन्यात होणाऱ्या या यात्रेत स्थानिक नागरिकाबरोबर कामधंद्या निमित्त बाहेरगावी राहणाऱ्या नागरिक देखील मोठ्या प्रमाणात गावात दाखल होतात. त्यामुळे यावर्षी देखील वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
४ मे रोजी रात्री ७-०० ते ९-०० या वेळेत स्वराली संगीत कला मंच यांच्या वतीने संगीत भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग भजनी मंडळ यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच ५ मे रोजी पहाटे सहा वाजता मंदिरात अभिषेक होईल आणी त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी संगीत भजनाचा बरोबर दुपारी राजा पंढरीचा महिला हरीपाठ यांच्या वतीने हरीपाठचा कार्यक्रम होणार आहे दुपारी १२-०० वाजता महाप्रसादला सुरवात होणार आहे. या यात्रे निमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी समस्त भाविकांना उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *