Wednesday , August 26 2026
Breaking News

छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी पांगिरे येथे चंदन बियाण्यांचे मोफत वितरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी (ता.६ ) सकाळी १० वाजता पांगिरे येथे प्रतिमापूजन करून चंदन बियाण्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. येथील सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान व वीरभद्र ऑरगॅनिक अँड सँडलवुड ऍग्रीकल्चर सोसायटीतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा निपाणी परिसरातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
यावेळी सुमारे २५ किलो चंदन बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. या बियाण्यांची बाजारातील किंमत सुमारे २५०० रुपये प्रतिकिलो आहे. भविष्यात एकूण २५ हजार शेतकऱ्यांपर्यंत चंदन लागवडीचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. चंदन शेती ही दीर्घकालीन उत्पन्न देणारी पद्धत व पर्यावरणपूरक शेती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन चंदन लागवडीकडे वळावे, असा संदेशही या उपक्रमातून दिला जाणार आहे. सदर कार्यक्रम पांगिरे येथे आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृष्णात शितोळे त्यांनी आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *