Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

करामसापच्या बहुभाषिक कविसंमेलनात कन्नड, बंगाली, उर्दू, मराठी साहित्यिकांचा सत्कार; बहुभाषिक रसिकांची बहुसंख्य उपस्थिती

  बेंगळुरू : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी, बेंगळूरू विभाग आयोजित बहुभाषिक कविसंमेलन दिनांक २१ जून रोजी सायंकाळी बेंगळूरूच्या हेब्बाळ परिसरात अत्यंत उत्साहात पार पडले. बेंगळूरूच्या विविध भागांतील विविध भाषिक कवी-कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता मान्यवरांसमोर सादर केल्या. या संमेलनात विषयांचे वैविध्य, शब्दरचना आणि सादरीकरणाची शैली साहित्यविश्वात रमवून ठेवणारी होती. …

Read More »

खानापूर शिवाजीनगरात दोन दुचाकींची भीषण धडक; सेवानिवृत्त पोस्टमास्तर गंभीर जखमी

  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात सोमवारी (दि. २२ जून २०२६) दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८, रा. मणतुर्गा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. …

Read More »

हेस्कॉमचे खाजगीकरण झाल्यास गंभीर परिस्थिती

  राज्यध्यक्ष राजू पोवार; रयत संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनासाठी बेंगलोरला रवाना निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या …

Read More »

बस धावताना दरवाजे बंद ठेवणे बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

    बेंगळुरू : प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (NWKRTC) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे बस धावत असताना दरवाजे उघडे ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, सर्व बसचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालक-वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे …

Read More »

मणतुर्गा–गावठाण रस्त्याचा मार्ग मोकळा; प्रशासन, शेतकरी आणि काँग्रेसच्या चर्चेतून सामंजस्याने तोडगा

  खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव यांच्या सूचनेनुसार मणतुर्गा गाव ते गावठाण रस्ता प्रकरणाला अखेर सकारात्मक वळण मिळाले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रशासन, शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. आज दुपारी १२ वाजता तहसीलदार, सर्वे विभागाचे अधिकारी, पीडीओ, काँग्रेसचे पदाधिकारी, पत्रकार तसेच …

Read More »

योगाभ्यासाचा संदेश समाजात पोहोचविण्याची गरज

  मुख्याध्यापक एस. एस. चौगुले : कुर्ली हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन निपाणी(वार्ता) : भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्व दिले आहे.सातत्याने योग व प्राणायाम केल्यास मानसिक आरोग्य चांगले रहाते. जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियमित योगाभ्यासाचा संदेश समाजात पोहोचविण्याची गरज असल्याचे मत कुर्ली हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी व्यक्त …

Read More »

सदलगा – चित्तापूर नूतन बस सेवा आजपासून प्रारंभ

  सदलगा : कल्याण कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ गुलबर्गा विभाग क्र १ कडून आजपासून सदलगा – चित्तापूर ही बस सेवा सुरू करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कलबुर्गी विभागीय नियंत्रक एस. जी. गंगाधर, चित्तापूर आगार व्यवस्थापक गोल्लालप्पा बिरादर यांच्या सहकार्याने ही बस …

Read More »

स्वत:च्या अपंगत्वालाच बलस्थानी ठेऊन परशराम गुरव बनले बस्तवाडच्या पंचक्रोशीतील पहिला वकील!

  खानापूर : बस्तवाड तालुका खानापूर येथील प्रशांत उर्फ परशराम हे क्लास टू शासकीय अधिकारी नोकरीत राहून अभ्यासाची कास घट्ट धरून रत्नागिरी येथील कायदा महाविद्यालच्या नुकताच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या कायदा परीक्षेत उत्तम गुणवतेसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून बस्तवाड, करजगी, मेरडा, हलगा, किरहलशी, जांभेगाळी, देवराई या पंचक्रोशीतील पहिले वकील …

Read More »

श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या राजवाड्यात मोहरम सणाला प्रारंभ

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर-सरकार यांच्या राजवाड्यामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला रविवारी (ता.२१) प्रारंभ करण्यात आला. निपाणी संस्थांनचे श्रीमंत दादाराजे निपाणकर यांनी ऊद घालून पिरपंजांची स्थापना केली. यापुढील काळातही रोज पाच दिवस करण्यात येणार आहे. अंबादास चितारे यांच्या हस्ते ताबूत सजवण्यात आले चार पिढ्या …

Read More »

निपाणी मराठा मंडळ शिक्षण संस्थेत जागतिक योगदिना निमित्त विविध उपक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित बालवाडी, मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व मराठा मंडळ हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात जागतिक योग दिन पार पडला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून योग प्रशिक्षक प्रवीण पाटील उपस्थित होते. पाटील यांनी, विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, …

Read More »