Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

काटगाळीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास विभागाची तात्काळ कारवाई

  खानापूर : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असताना महिला व बालविकास विभागाने वेळेवर हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले. स्पंदना स्वयं-सहाय्यता समूहाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच महिला व बालविकास विभागाचे सीडीपीओ विक्रम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. …

Read More »

राज्यात ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरूच; तिसऱ्या शनिवारी पुस्तके नव्हे, अनुभवातून शिक्षण

  बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी व्हावे, शिक्षण अधिक आनंददायी व अनुभवाधारित व्हावे तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदाही ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी …

Read More »

व्यसनामुळे कुटुंबासह समाजाचे नुकसान

  कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान निपाणी (वार्ता) : मादक पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही नुकसान करणारे आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य, गांजा, अमली पदार्थासारख्या व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. सध्या व्यसनमुक्त युवक हीच सक्षम समाजाची ताकद असल्याचे मत निपाणी ग्रामीण पोलीस …

Read More »

राज्यातील वीज खाजगीकरण प्रक्रिया रद्द करा; ‘रयत’तर्फे तहसीलदारांना निवेदन

अन्यथा राजू पोवार यांचा आंदोलनाचा इशारा निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने राज्यातील वीज वितरण प्रणाली खाजगी कंपन्यांच्या हाती सोपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिक, शेतकरी, रोजंदारी मजूर आणि वीज ग्राहकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वीज ही सर्वसामान्य माणसाची मूलभूत गरज असू तिचे नियंत्रण खाजगी कंपन्यांना देणे हे जनहिताच्या विरोधात आहे. त्यामुळे …

Read More »

अर्धा जून न उलटला तरीही शेतकऱ्यांचे डोळे वरूनराजाकडे

  मृग नक्षत्र कोरडे गेल्याने हंगाम वाया जाण्याची भीती निपाणी (वार्ता) : मृगातील पाऊस पडल्यावर पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा मृग नक्षत्र लागून आठवडा उलटला तरी पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकनी केली आहे. पण त्यानंतर …

Read More »

एआय-आधारित ‘कर्तव्य’ हजेरी प्रणालीला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेंगळूर : सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्याबरोबरच प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘कर्तव्य’ हजेरी नोंदणी प्रणालीला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री तथा प्रशासकीय सुधारणा विभागाचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी ‘कर्तव्य’ ॲपची अंमलबजावणी वेगाने आणि …

Read More »

विधान परिषदेत काँग्रेसची सरशी; ७ पैकी ५ जागांवर विजय

  भाजपला २ जागा, धजदचा उमेदवार पराभूत, क्रॉस व्होटींगमुळे भाजप-धजदला धक्का बंगळूर : कर्नाटक विधान परिषदेच्या सात जागांसाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवत पाच जागांवर विजय मिळवला. भाजपच्या खात्यात दोन जागा गेल्या, तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात धजदला एकही जागा मिळाली नाही. काँग्रेसचे पाचवे उमेदवार विनय …

Read More »

आईला ड्युटीवर सोडण्याच्या तयारीत असतानाच कोसळला; बॉडीबिल्डर सुशील कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  दावणगेरे (कर्नाटक): राष्ट्रीय स्तरावरील बॉडीबिल्डर सुशील कुमार (वय 26) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक घटना दावणगेरे येथे घडली. आईला रुग्णालयात ड्युटीवर सोडण्यासाठी घराबाहेर पडण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते घरासमोरच कोसळले. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, …

Read More »

नीट पुनर्परीक्षेपर्यंत टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

  बेंगळुरू : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (NTA) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या अनुषंगाने केंद्र सरकारने टेलिग्राम या संदेशवहन प्लॅटफॉर्मवरील प्रवेशावर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी तपास सुरू असून, मागील …

Read More »

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर खानापूर प्रशासन सतर्क; आपत्ती निवारण पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना कडक इशारा

  खानापूर : मान्सून काळात उद्भवू शकणाऱ्या पूर व इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी खानापूर तालुका प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला असून, तालुका पंचायत सभागृहात आपत्ती निवारण पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखाधिकारी परशुराम दुडगुंटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात …

Read More »