Wednesday , August 19 2026
Breaking News

व्यसनामुळे कुटुंबासह समाजाचे नुकसान

Spread the love

 

कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर व्याख्यान

निपाणी (वार्ता) : मादक पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाचेही नुकसान करणारे आहे. तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्य, गांजा, अमली पदार्थासारख्या व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. सध्या व्यसनमुक्त युवक हीच सक्षम समाजाची ताकद असल्याचे मत निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक प्रा. अशोक शिंदे यांनी व्यक्त केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित जनजागृती कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले हे होते.
एस. ए. पाटील यांनी स्वागत केले. प्रा शिंदे यांनी, शालेय जीवनात विद्यार्थी व्यसनाच्या आहारी कसे जातात व त्याचे परिणाम काय होतात. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण पोलीस ठाण्यातर्फे विद्यार्थ्यांनी संकल्प प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी सहाय्यक उपनिरीक्षक टी. एस. दळवाई, जी. एन. वडराळे, एस. एस.. साळवी, एम. बी. खिरुगडे, पी. व्ही कांबळे, श्रद्धा चौगुले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. के. ए. नाईक यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली

Spread the love  दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *