Thursday , August 27 2026
Breaking News

खगोलशास्त्रीय घटनेमुळे सावली होणार गायब

Spread the love

 

५ मे रोजी निपाणी परिसरात शून्य सावली दिवस ; एस. एस. चौगुले यांची माहिती

निपाणी (वार्ता) : पृथ्वीवर अनेक खगोलीय घटना सतत घडतात. हवामानातील बदलांमुळे कांही पाहता येतात तर कांही पाहता येत नाहीत. अशा घटनापैकी या महिन्यांत शून्य सावलीचे दिवस हा मजेशीर अनुभव घेता येणार आहे. खगोलशास्त्रीय भाषेत त्याला ‘झिरो शॅडो’ म्हंटले जाते. बेळगांव जिल्ह्यात २ मे पासून सुरू झालेला हा सावल्यांचा खेळ ७ मे पर्यंत मेपर्यंत कायम राहील. निपाणी भागात ५ मे रोजी ही घटना पाहायला मिळणार असल्याची माहिती कुरली हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी दिली.
चौगुले म्हणाले, सूर्य डोक्यावर आल्यावर उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्या वेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला शून्य सावली असे म्हणतात.सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन आहे. त्यामुळे निपाणी परिसरात ५ ते ७ मे च्या दरम्यान ग्रामीण भागात हा अनुभव घेता येईल. पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करताना ती सूर्याभोवतीही फिरते. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. यामुळेच दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे २३ डिसेंबर ते २१ जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन सुरू असते. उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य अवकाशात बरोबर डोक्‍यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.
या दरम्यान दोन असे दिवस मध्यान्हाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली पडून काही वेळासाठी ती नाहीशी होते आणि शून्य सावली अनुभवता येतो. अशी स्थिती काही ठरावीक दिवसांमध्येच निर्माण होते.पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्‍यावर येत नाही. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य माध्यान्हाच्या वेळेस बरोबर डोक्‍यावर आलेला अनुभवायला मिळतो.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक पुरस्काराबद्दल निपाणीत डॉ. एन. डी. जत्राटकर यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *