Wednesday , August 26 2026
Breaking News

कच्च्या मालाच्या दरवाढीने नाष्ट्यामध्ये १० टक्के दरवाढ

Spread the love

 

हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत निर्णय; सिलेंडर मध्येही ९९३ रुपयांची वाढ

निपाणी (वार्ता) : इराण-अमेरिका-इस्राईल युद्धामुळे एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. शिवाय आता त्यामध्ये ९९४ रुपयांनी तर खाद्यतेलासह कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील पदार्थांच्या किमती नाईलाजाने १० टक्के वाढविण्याचा निर्णय येथील हॉटेल व्यवसाय असोसिएशनने घेतल्याची माहिती असोसिएशनचे पदाधिकारी मधुकर खवरे यांनी सांगितले. व्यवसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते.
खवरे म्हणाले, व्यवसाय सिलेंडरचा तुटवडा आणि कच्च्या मालाचे दर वाढल्याने निपाणीतील अनेक हॉटेल्स व लहान व्यवसाय बंद पडले आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे.तर व्यावसायिक सिलेंडरही मिळत नसल्याने हॉटेल, छोटे-मोठे व्यवसायही अडचणीत सापडले आहेत. गॅस नसल्यामुळे अनेकांनी चुलींचा सहारा घेतला, तर काहींनी हॉटेल, दुकांनांना टाळेही लावले. विद्यार्थी आणि नोकरदारांचे मेसही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे बाहेरगावी राहणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्या उदरभरणचे वांदे होत आहेत.
दीपक इंगवले यांनी, वडापाव, भजीपाव, समोसा यांच्या किंमती वाढल्या आहेत. तसेच गॅस टंचाईने पदार्थाचे प्रकारही कमी करावे लागत आहेत. वडापाव, पुरी भाजी मिसळ पाच रुपयांनी महागला आहे. गॅस सिलेंडर, बेसन आणि तेलाच्या वाढत्या किमतीमुळे नाष्टाचे दर वाढविण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सुरू असून ग्राहकांनी सहकार करण्याचे आवाहन केले. बैठकीस
यावेळी अरुण खडके, राहुल भाटले, बाळासाहेब जासूद, हर्षा शेट्टी, सुनील सांगावकर, संदीप खडके, शोयब मुल्ला, नरेंद्र येजरे, सुहास दुधाने, निहाल सांगावकर, पिंटू बोधले, किशोर सांगावकर, प्रसाद बोरगावे, विक्रांत दबडे, केदार येतेकरी यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

Spread the love  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *