Wednesday , August 26 2026
Breaking News

कडोली मराठी साहित्य संघाचा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मान

Spread the love

 

कडोली : येथील कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (जि. पुणे ) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेने ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. संघाच्या साहित्य क्षेत्रातील रचनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे.

शिवांजली साहित्यपिठातर्फे 33 वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव -2026 ता. १ ते ३ मे दरम्यान चाळकवाडी येथे उत्साहात झाला. या महोत्सवात डॉ. पंडित विद्यासागर व डॉ. केशव देशमुख यांच्या हस्ते संघाचा सन्मान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथ व गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते.
साहित्य संघाचे अध्यक्ष मोहन पाटील, माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, कार्यकर्ते किरण पवार व सुनील पवार यांनी पुरस्कार स्वीकारला.यावेळी शिवांजली संस्थेचे प्रवर्तक शिवाजी चाळक, लेखक डॉ. ला. रा. लामखडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवाजी चाळक यांनी प्रास्ताविकात कडोली मराठी साहित्य संघाच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यावेळी शिवांजली संस्थेचे पदाधिकारी, महाराष्ट्रातील विविध भागातील लेखक, कवी व साहित्य रसिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *