Thursday , August 27 2026
Breaking News

निपाणी शिक्षक संघ निवडणूकीत चुरशीने मतदान होऊन गुरुसेवा पॅनेलचा विजय

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा शिक्षक संघ निपाणी तालुका संघटनेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता.१) चुरशीने पार पडली. गुरुसेवा पॅनेलने ४ बिनविरोध महिला उमेदवारांसह सर्व ८ जागांवर विजय मिळवला तर विरोधी शिक्षक सेवा पॅनेल पराभुत झाले.
यामध्ये दिवसभरात ५६३ पैकी ५०८ शिक्षकांनी मतदान केले. ९०% मतदान झाले. रात्री उशिरा मतमोजणी पूर्ण झाली.
यामध्ये भास्कर स्वामी यांना ४३७, संतोष पाटील – ४३२, मुबारक जैनापुरे – ४२१, दिपक मधाळे – ४१९, सुनिल शेवाळे – ४१७, फिरोजखान इनामदार – ४११, वाय. टी. पाटील – ४०७, प्रकाश चव्हाण – ४०३ मते. तर महिला गटातून शिल्पा भुसानी, अर्चना कोठरे, सुवर्णा कांबळे, लता इंदलकर बिनविरोध निवडून आल्या. तर विरोधी पॅनेलचे प्रकाश कदम (१५२), सदाशिव तराळ (१४५), शहाजी माने (१०५) मतांवर पराभूत झाले. निवडणूक अधिकारी म्हणून टी. एम. भोसले, राहुल कांबळे, आय. एच. सय्यद यांनी काम पाहिले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. दुपारी काही काळ मतदान केंद्रे विरळ झाली होती. ऊन कमी होताच पुन्हा मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यावेळी मतदारांना गार पाणी आणि व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्राच्या परिसरात पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. विजय झालेल्या गुरु सेवा पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

About Belgaum Varta

Check Also

पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक पुरस्काराबद्दल निपाणीत डॉ. एन. डी. जत्राटकर यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : पुणे येथील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे “पाली-मराठी” भाषेचे पहिले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *