


निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित कार्यक्रमात निपाणी शहर अंजुमन कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सहकारत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी नवनियुक्त अध्यक्ष पदी इलियास पटवेगार, उपाध्यक्षपदी बक्तीयार कोल्हापुरे, सेक्रेटरी पदी फारूक गवंडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
यावेळी हुसेन तहसीलदार, ताजुद्दीन मुजावर, जावेद कुमनाळे, नदीम बागवान, समीर सय्यद, खालील चावलवाले, शौकत बागवान, रियाज बागवान, जावेद नाईक, अब्बास फरास, साहेब पटेल, इकबाल झारी, बासू पटेल, वाशिम हुकेरी, नजीर कोच्चारागी, खुदबुद्दीन हदाले यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta