Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर

Spread the love

 

 

बेंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता हा विस्तार आणखी दोन ते तीन दिवस पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आज बेंगळुरूला परतणार असून, आठवड्याच्या अखेरीस ते पुन्हा दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडसोबत अंतिम चर्चा करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे नव्या मंत्र्यांच्या यादीला अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडींमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्याची इच्छा नसली तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसार घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ आणि नवोदित आमदारांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही शिवकुमार यांनी सांगितले. मंत्रीपदासाठी अनेक इच्छुक पात्र असून, शक्य तितक्या रिक्त जागा भरल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *