Sunday , September 20 2026
Breaking News

सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकास यांवर आधारित ओपन हाऊस कार्यक्रम नुकताच बीकन हॉटेल, बेळगाव येथे उत्साहात पार पडला.

दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित या कार्यक्रमात सहभागी आणि पाहुण्यांना सार्वजनिक वक्तृत्वाची कला, प्रभावी संवादकौशल्य तसेच आत्मविश्वासपूर्ण नेतृत्वाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आले. विविध सत्रांद्वारे उपस्थितांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील संवादकौशल्य विकसित करण्याची आणि आत्मविश्वासाने विचार मांडण्याची प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अध्यक्षा रोटेरियन दिव्या एम. यांच्या नियोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच रोटेरियन राजनंदा गर्गी, रोटेरियन अनुपमा कळ्ळोळ, रोटेरियन रेणुका मोत्रे आणि रोटेरियन सविता वेसणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि आजीवन शिक्षणाची प्रेरणा देणारे व्यासपीठ निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करीत राहील, असा विश्वास अध्यक्ष रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *