निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्याकडे बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या तीन गायींची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणात सदलगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून वाहन जप्त केले असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगावमार्गे एका टेम्पोमधून दोन …
Read More »लॅटराईटच्या परवानगीवर बॉक्साईटची लूट? हबनहट्टीतील खाणकामावर संशयाचे गडद सावट
खानापूर : खानापूर तालुक्यातील हबनहट्टी येथील सर्व्हे क्रमांक ७ मधील खाणकाम सध्या चर्चेचा विषय ठरत असून, “परवानगी लॅटराईटची आणि उत्खनन बॉक्साईटचे” असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे खाण व भूविज्ञान विभाग, वन विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निपाणीत गर्दी
वह्यावर ५ टक्के जीएसटीचा भार ; पालकांच्या खिशाला कात्री निपाणी (वार्ता) : नवीन शैक्षणिक क्षेत्राला प्रारंभ झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे. छापील पुस्तके व वह्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला आहे. त्यातच तयार वहीवर ५ टक्के जीएसटी …
Read More »निपाणीतील हिंदू खाटीक समाजातर्फे सिद्धेश्वर, बिरदेवाची वार्षिक वार्षिक यात्रा उत्साहात
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील हिंदू खाटीक समाजाचे आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर बिरदेवाची वार्षिक यात्रा रविवारी (ता.७) भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यात्रेनिमित्त श्री बिरदेवाची पालखी मिरवणूक खरी कॉर्नर येथून प्रारंभ करण्यात आली. शिवाजीनगर, अंबाबाई मंदिर, यरनाळ रोड ते बिरदेव मंदिर पर्यंत काढण्यात आली. यावेळी आंबील कलश घेऊन महिला सहभागी …
Read More »साहित्य हा समाजाचा आरसा; संमेलनाध्यक्ष साताप्पा सुतार
मानकापूरमध्ये साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. देव दगडात नसून तो भुकेलेल्या, तहानलेल्या, भिकारी, अपंग, आंधळे- पांगळे यांच्या ह्रदयात आहे. त्यांची सेवा केल्यास देव भेटल्या शिवाय राहणार नाही. साहित्य हा समाजाचा आरसा आहे. साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करुन समाज सुधारण्याचे काम झाले पाहिजे. यासाठी नवोदित …
Read More »अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण निमित्त बीज संकलन उपक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह बीज संकलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आज स्कूलच्या आवारात लावली. यामध्ये आंबा, फणस, चिकू याच शिवाय विविध प्रकारच्या औषधी व इतर …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये शेतकऱ्यांसमवेत पर्यावरण दिन
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन शेतकरी, पालकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या परिसरात रोप लागवड करुन पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य स्नेहा घाटगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ निंबाळकर, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील, हरी कागले, सुशीला …
Read More »खातेवाटपावरील वाद मिटला; रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा घेतला मागे
बंगळूर : जलसंपदा खाते मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्रीपदाचा राजीनामा दिलेले रामलिंगा रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडच्या हस्तक्षेपानंतर आणि समेटाच्या प्रयत्नांनंतर आपला राजीनामा मागे घेतला आहे. खातेवाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि मतभेद आता निवळल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला …
Read More »सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर; अभियांत्रिकीत तनिषा कार्तिक, पशुवैद्यकीयमध्ये नयना गोपी अव्वल
बंगळूर : सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी)चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत निकालाची घोषणा केली. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाचे (केईए) कार्यकारी संचालक एच. प्रसन्न यांनी दिली. यंदा अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, …
Read More »सहकाररत्न उत्तम पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील युवा नेते सहकाररत्न उत्तम पाटील यांनी बंगळुरू येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta