Sunday , September 20 2026
Breaking News

मतदार संघातील समस्यासाठी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय

Spread the love

 

खासदार प्रियांका जारकीहोळी; मतदार संघ काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील नागरिकांसाठी येथे काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी संगणक आणि ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. एस आय आर नोंदणी करून आपला मतदानाचा अधिकार अबाधित ठेवावा. याशिवाय मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी केले.
येथील साखरवाडीमध्ये काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन करून त्या बोलत होत्या.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालय सुरू केले आहे. या पुढील काळात मतदारांनी आपल्या समस्या कार्यालयात मांडल्यास त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबांनी एस आय आर नोंदणी करावी. त्यासाठी काही समस्या व उद्भवल्यास कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी खासदार जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, सुप्रिया पाटील, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, राजेश कदम, चंद्रकांत जासूद, सुजय पाटील, बसवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, प्रतीक शहा, किरण पाटोळे, प्रमोद पाटील, अस्लम शिकलगार, वर्षा चव्हाण, अरुण आवळेकर, किरण कोकरे, झाकीर कादरी, संदीप चावरेकर यासीन मनेर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *