Friday , November 6 2026
Breaking News

क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूंच्यात शिस्त, जिद्द व संघ भावना निर्माण होते : रोहिणी पाटील

Spread the love

 

 

विद्याभारती जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा

बेळगाव : क्रीडा स्पर्धेमुळे खेळाडूमध्ये शिस्त, जिद्द, आणि संघ भावना निर्माण होते. बेळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी क्रीडाक्षेत्राचा फायदा घेऊन राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव उज्वल करावे व खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रासाठी कठोर मेहनत व सातत्य ठेवण्याचे आव्हान एकलव्य पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय ज्युडो खेळाडू रोहिणी पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्याभारती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उदगार काढले.
नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ज्युडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील, लैला शुगर फॅक्टरीचे संचालक सदानंद पाटील, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी अशोक शिंत्रे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव एस व्ही कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय शालेय क्रीडापटू अनिरुद्ध हलगेकर, संचित धामणेकर, समर्थ पानारी, श्रेयस किल्लेकर, यश हळसीकर, भावना बेर्डे, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर, मेघा कलखाबकर, या खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुणे यांच्याकडे सुपूर्द केली. खेळाडू चंदन श्रेयस यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देवविली, यानंतर पाहुण्यांचे हस्ते ओमकार, सरस्वती, भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली. याप्रसंगी क्रीडाशिक्षक अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, ओंकार गावडे, श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, स्वाती सावंत, गंगा गाणीकोप्प, हर्ष रेडेकर, प्रीती भांदुर्गे, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, सोहेल विजापूरे, सृष्टी भोंगाळे, संभवी स्वामी, प्रतीक एच, बसवंत पाटील, शामल दड्डीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरोजा कटगेरी तर प्रेमा मेलिनमनी यानी आभार मानले. या स्पर्धेत संत मीरा अनगोळ, संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी, हनिवेल स्कूल खानापूर, ज्ञान प्रबोधनी स्कूल रामदुर्ग शाळेच्या 350 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे.

फोटो ओळी
प्रमुख पाहुणे रोहिणी पाटील सदानंद पाटील यांच्याकडे क्रीडाज्योत सुपूर्द करताना खेळाडू शेजारी परमेश्वर हेगडे,एस व्ही कुलकर्णी,माधव पुणेकर आर के कुलकर्णी, सुजाता दप्तरदार, शिवकुमार सुतार,

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *