Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

राज्यातल्या भाजप सरकारामुळे खानापूर तालुक्याचा विकास खुंटला

आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका निसर्ग प्रधान तालुका आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी राज्यातील भाजप सरकार कुचकामी ठरले आहे. पहिल्यांदाच खानापूर तालुक्यात काँग्रेसच्या आमदारांनी 800 कोटी रूपयाचा निधी आणला असला तरी राज्यातील भाजप सरकार विकासाच्या बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली …

Read More »

क्रांतीसाठी समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक : प्रा. डॉ. अच्युत माने

समता सैनिक दलातर्फे अभिवादन निपाणी : निपाणी परिसर हा क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. अजूनही काही प्रमाणात दलित, शोषित, पीडित आणि शेतकर्‍यांवर अन्याय सुरुच आहे. त्यामुळे समाजात बदल करण्यासाठी तरुणांची फौज आवश्यक आहे. सामान्य माणूस हाच क्रांतीचा आधार आहे. 70 वर्षानंतर हे अपेक्षित स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्‍या स्वातंत्र्याची गरज …

Read More »

विधानपरिषद निवडणूक सुरळीत पार पाडा

मोहन भस्मे : निपाणी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम निपाणी : शुक्रवारी (ता. 10) होणार्‍या विधान परिषद निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये आयोजित पीआरओ व एपीआरओ निवडणूक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देताना ते बोलत होते. प्रारंभी …

Read More »

दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!

कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …

Read More »

क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ठरला समितीला बळ देणारा

खानापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीतजास्त स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक असून येणार्‍या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक सक्षमपणे लढा पुढे घेऊन जाईल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात समितीच्या बळकटी करणावर भर देण्यात आल्याने हलशीवाडी येथे समितीचा मेळावा भरल्याचे …

Read More »

नियम कडक करताच मास्कची मागणी वाढली

विविध आकारासह रंगसंगती : महिलांचा कल मॅचिंगकडे निपाणी : राज्य सरकार तसेच प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. निपाणी बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगबिरंगी विविध प्रकारच्या मास्कचे दुकाने सजली आहेत. महिलांकडून विशेषत: मॅचिंग मास्क खरेदीकडे कल वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. केंद्र …

Read More »

निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्‍या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …

Read More »

जांबेगाळीच्या शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : जांबेगाळी (रेडेकुंडी) (ता. खानापूर) येथील शेतकरी प्रकाश बाळकृष्ण देसाई (वय 46) हे आपल्या बैलगाडीतून शेतात मळणी केलेले भात आणण्यासाठी शनिवारी दि. 4 रोजी सायंकाळी जात असताना बैलगाडी पलटी झाल्याने प्रकाश देसाई यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक …

Read More »

लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ

फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …

Read More »

खानापूरच्या विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे. याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे. विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे. विद्यानगरात गटारीची समस्या …

Read More »