निपाणी (वार्ता) : मानकापूरातील हुडा चौक महादेव मंदिर जवळ शेतकरी जनजागृती मेळावा पार पडला. त्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी जळालेल्या पंचवीस एकरातील उसाचे नुकसान भरपाई हेस्कॉमकडून कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात आली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी सत्याप्पा माळी होते. एकरामध्ये १०० टन …
Read More »म्हैसूर येथे दिवसाढवळ्या दरोडा; केरळच्या व्यावसायिकाची मोटार, रोख रक्कमेसह पलायन
बंगळूर : चार दरोडेखोरांच्या टोळीने म्हैसूर जिल्ह्यात केरळच्या एका व्यावसायिकावर हल्ला केला आणि त्याची कार आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. हे कृत्य एका वर्दळीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडले आणि काही वाटसरूंनी घेतलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले …
Read More »मुडा भूखंड जप्तीशी माझा काहीही संबंध नाही
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; ईडीचे प्रसिध्दी पत्रक राजकीय हेतूने प्रेरित बंगळूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जागा ताब्यात घेतल्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रसिध्दी पत्रकाशी माझा काहीही संबंध नाही. ते राजकीय हेतूने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुडा घोटाळ्याच्या संदर्भात ३०० …
Read More »हलशीवाडी युवा स्पोर्ट्सच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
खानापूर : हलशीवाडी (ता. खानापूर) येथील युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने 25 जानेवारी रोजी भव्य हाफपीच सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा क्रिकेट संघानी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्पोर्ट्स यांच्यावतीने क्रिकेट स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात असून हाफपीच क्रिकेट स्पर्धेतील …
Read More »दूधगंगा नदीत भल्या मोठ्या मगरींचे दर्शन
चिककोडी : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरालगत दूधगंगा नदी पात्रात दोन महाकाय मगर तसेच मगरीची पिल्ले आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये वेदगंगा आणि दूधगंगा नद्यांना पूर आला होता. दिवसाढवळ्या नदीकाठी मगरी दिसू लागल्या. एकसंबा शहरातील शेतकरी विश्वनाथ कागे म्हणाले की, एकसंबा शहरातील दूधगंगा …
Read More »कवितामुळे अनेकांचे मन परिवर्तन : प्रा. शिवाजीराव भुकेले
गुलमोहर’कविता संग्रहाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : कुशापराव पाटील यांच्या कविता सर्वसमावेशक आहेत. कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे चित्रण केले म्हणूनच त्यांच्या कविता वाचनीय ठरले आहेत. त्यामधील स्त्रीभ्रूणहत्या या प्रश्नावरच्या कवितेमुळे अनेकांचे मन परिवर्तन झाल्याचे मत प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी व्यक्त केले.कुशापराव पाटील यांच्या ‘गुलमोहर’ कवितासंग्रहाचे प्रकाशन निसर्ग लॉ मध्ये पार …
Read More »ओलमणी गावातील शैक्षणिक फंडाचा स्तुत उपक्रम..
खानापूर : शैक्षणिक फंडाच्या वतीने वार्षिक सप्ताच्या निमित्ताने सामान्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले. ओलमणी गावात पारंपरिक शैक्षणिक फंडाची निर्मिती केली गेलेली आहे. आणि या फंडातून विविध असे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रत्येक इयत्तेतून येणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकांना तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गुणगौरव केला …
Read More »नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा; माजी आमदार दिगंबर पाटील यांचे आवाहन
खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन खानापूर : मराठी अस्मितेसाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करणे मराठी भाषिकांचे नित्य कर्तव्य आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गटतट बाजूला सारुन नव्या जोमाने सीमालढ्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले. येथील स्टेशन रोडवरील हुतात्मा नागाप्पा होसुरकर …
Read More »खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणूक २७ रोजी; दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव
खानापूर : खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणूक सोमवार दि. २७ जानेवारी रोजी होणार आहे. त्याबाबतची नोटीस शुक्रवारी (दि. १७) सर्व २० नगरसेवकांना प्राप्त झाली आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव झाल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या …
Read More »बिदरमध्ये सशस्त्र दरोडेखोरांकडून दोन सुरक्षा रक्षकांची हत्या
एटीएमसाठी आणलेली ९३ लाखांची रोकडही लुटली बंगळूर : बिदरच्या जिल्हा मुख्यालयातील एसबीआय एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली ९३ लाखांची रोकड पळवण्यापूर्वी दुचाकीवरून आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी गुरुवारी दोन सुरक्षा रक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरक्षा एजन्सीचे तीन कर्मचारी एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta