निपाणी : मराठी माध्यम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणासह इतर विषयांची पाठ्यपुस्तके मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विविध सामाजिक, शैक्षणिक व मराठी संघटनांच्या प्रतिनिधींनी निपाणी क्षेत्र शिक्षण कार्यालयाकडे केली आहे. यासंदर्भात क्षेत्र शिक्षणाधिकारी मा. नाईक मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, निपाणी परिसरातील मराठी …
Read More »बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील लढा तीव्र करा; २२ जूनच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : गोपाळ देसाई
खानापूर : बेकायदा कन्नड सक्तीविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी गावागावांत जनजागृती वाढवून २२ जून रोजी बेळगाव येथे आयोजित भव्य मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले. तर सीमाभागातील प्रश्नांवर युवा समिती करीत असलेले कार्य योग्य दिशेने असून त्यांच्या प्रत्येक उपक्रमाला …
Read More »निपाणी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी
संघटनेच्या वार्षिक सभेत निवड निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सूर्यवंशी यांनी स्वागत व केले. अध्यक्ष नरेंद्र बाडकर, उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी गतवर्षी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. पेट्रोलचे दर व इतर महागाई पाहता तसेच फोटोग्राफीमध्ये …
Read More »राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागात महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
निपाणी (वार्ता) : सध्या पुणे बंगळुरू राखी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. भविष्यकाळातील वाहनासह नागरिकांची संख्या लक्षात घेऊन आंदोलन नगर, प्रगती नगर, शाहूनगर, आश्रय नगर, सरकार कॉलनी, संभाजी नगर येथील रहिवासी आणि वाहनधारक या महामार्गावरील लहान बोगद्यातून नियमितपणे प्रवास करतात. मात्र बोगदा लहान …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षक संघटनेतर्फे मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढण्याच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक अनुदानित शाळा-महाविद्यालय कर्मचारी संघाच्या चिकोडी जिल्हा संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना गोकाक येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. संघटनेचे राज्याध्यक्ष जी. हनुमंतप्पा म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करावी. अनुदानित शाळा-महाविद्यालय …
Read More »पावसाचे संकेत देणाऱ्या चातक पक्षाच्या आगमनाने निपाणी परिसरातील शेतकरी आनंदी
निपाणी (वार्ता) : पावसाचे संकेत देणाऱ्या चातक पक्षाचे निपाणी परिसरातील शिवारात आगमन झाले आहे. त्यामुळे मान्सून यंदा वेळेवर सुरू होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यासह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत या भागात पावसाच्या सरी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळे मान्सून पावसाकडे लागले आहेत. निपाणी परिसरात दरवर्षी चातक पक्षी मान्सून …
Read More »हेम्माडगा बससेवा अखेर सुरू; ग्रामस्थांच्या दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम
खानापूर : हेम्माडगा गावासाठी नवीन बससेवा आज सोमवारपासून सुरू करण्यात आली असून, यामुळे परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. हेमडगा ग्रामस्थांची ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. पंचहमी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमडगा बससेवा सुरू करण्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला होता. विजय …
Read More »बोरगांव येथे गोरक्षक समितीतर्फे ३ गायींची सुटका; सदलगा पोलिस ठाण्याची सतर्कता
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्याकडे बेकायदेशीरपणे नेण्यात येत असलेल्या तीन गायींची सुटका करण्यात यश आले. या प्रकरणात सदलगा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून वाहन जप्त केले असून संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगावमार्गे एका टेम्पोमधून दोन …
Read More »लॅटराईटच्या परवानगीवर बॉक्साईटची लूट? हबनहट्टीतील खाणकामावर संशयाचे गडद सावट
खानापूर : खानापूर तालुक्यातील हबनहट्टी येथील सर्व्हे क्रमांक ७ मधील खाणकाम सध्या चर्चेचा विषय ठरत असून, “परवानगी लॅटराईटची आणि उत्खनन बॉक्साईटचे” असा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणामुळे खाण व भूविज्ञान विभाग, वन विभाग, परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निपाणीत गर्दी
वह्यावर ५ टक्के जीएसटीचा भार ; पालकांच्या खिशाला कात्री निपाणी (वार्ता) : नवीन शैक्षणिक क्षेत्राला प्रारंभ झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी व पालकांची येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे. छापील पुस्तके व वह्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाला आहे. त्यातच तयार वहीवर ५ टक्के जीएसटी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta