Monday , June 8 2026
Breaking News

निपाणी तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी

Spread the love

 

संघटनेच्या वार्षिक सभेत निवड

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी असोसिएशनचे सेक्रेटरी संजय सूर्यवंशी यांनी स्वागत व केले. अध्यक्ष नरेंद्र बाडकर, उपाध्यक्ष विनायक पाटील यांनी गतवर्षी राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. पेट्रोलचे दर व इतर महागाई पाहता तसेच फोटोग्राफीमध्ये लागणाऱ्या सर्वच साहित्याचे दर वाढल्याने फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीमध्ये २५ ते ३० टक्के दरवाढ करण्याचे निश्चित करण्यात आले. यंदाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी ‌श्रावण कांबळे, प्रदीप भोईटे यांची सेक्रेटरीपदी विनायक पाटील यांची खजिनदारपदी नरेंद्र बाडकर यांची निवड करण्यात आली. संचालकपदी बंडू कुंभार, संतोष जरग, राहुल तावदारे, सानिका ढंग, राहुल पाटील, अमित मुरगुडे, संदेश सूर्यवंशी, अलंकार कांबळे, इराप्पा मडिवाळ, सुरज कराळे, यांची निवड करण्यात आली. तर सल्लागारपदी विजय दावणे, विजय नार्वेकर, श्रद्धा माळी, गंगाधर कळसन्नावर यांची निवड करण्यात आली
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार जेष्ठ छायाचित्रकार मारुती घाटगे, राजू शिरोळे, निवास जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी या वर्षात छायाचित्रकारां साठी विविध उपक्रम राबवणार असून कर्नाटक राज्य फोटोग्राफर असोसिएशनतर्फे राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा सर्व छायाचित्रकारांना मिळवून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी श्रीकांत कुंभार, वैभव कंगळे, आप्पासो दिंडे, योगेश्वर काजवे, आकाश पाटील, ऋतुराज पायमल, संतोष साळुंखे, किरण पाटील, राहुल मजगे, विश्वनाथ गुडसे, केतन पाटील, रणजीत पाटील, नंदकुमार चेंडके, राजेंद्र शिरोळे, निलेश शेंबाळे, सुमित रणदिवे, प्रसाद परीट, रतन कांबळे, पांडुरंग सदलगे यांच्यासह फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनायक पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगांव येथे गोरक्षक समितीतर्फे ३ गायींची सुटका; सदलगा पोलिस ठाण्याची सतर्कता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील गोरक्षक समिती व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सतर्कतेमुळे कत्तलखान्याकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *