Monday , June 8 2026
Breaking News

अल्पवयीन मुलगा कार चालवताना पकडला; वाहन मालकाला २५ हजारांचा दंड

Spread the love

 

बेळगाव : शहरातील चन्नम्मा सर्कल परिसरात वाहतूक पोलिसांनी सोमवारी अल्पवयीन मुलगा कार चालवत असल्याचे आढळून आल्यानंतर वाहन मालकाविरुद्ध कठोर कारवाई केली. न्यायालयाने संबंधित वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे १०.५० वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलिसांची तपासणी सुरू असताना केए-26-एम-3409 क्रमांकाची कार एका अल्पवयीन मुलाकडून चालवली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारसह मुलाला ताब्यात घेतले.

यानंतर संबंधित मुलाच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे हा मोटार वाहन कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याची माहिती देण्यात आली. प्रकरणाची नोंद करून वाहन मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. सुनावणीनंतर न्यायालयाने वाहन मालकाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी अथवा चारचाकी वाहने देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मृगाच्या उंबरठ्यावर वरुणराजाची कृपा; खरीप हंगामासाठी शेतकरी पल्लवीत

Spread the love  बेळगाव : अनेक दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *