Monday , September 21 2026
Breaking News

उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५, वडगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा क्रमांक ५, वडगाव येथे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, जनजागृती प्रभातफेरी आणि विद्यार्थिनींना वृक्षांचे वाटप अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सीआरपी प्रमुख श्री. इमाम सनदी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना वृक्षांचे पर्यावरणीय आणि सामाजिक महत्त्व विशद केले. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एम. बेलगामी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थिनींना वृक्षारोपणात सहभागी होण्याचे आवाहन केले. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर विद्यार्थिनींनी प्रभातफेरी काढून पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत परिसरात जनजागृती केली. इको क्लबच्या प्रमुख श्रीमती दीपा देसूरकर यांनी विद्यार्थिनींना वृक्षांचे वाटप करून त्यांची नियमित जोपासना करण्याची शपथ दिली.

या कार्यक्रमास श्री. नितीन बेनके, श्रीमती विजया रसाळ, श्रीमती वैशाली पाटील, श्रीमती सरिता पाटील तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *