Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागात महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सध्या पुणे बंगळुरू राखी महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. भविष्यकाळातील वाहनासह नागरिकांची संख्या लक्षात घेऊन आंदोलन नगर, प्रगती नगर, शाहूनगर, आश्रय नगर, सरकार कॉलनी, संभाजी नगर येथील रहिवासी आणि वाहनधारक या महामार्गावरील लहान बोगद्यातून नियमितपणे प्रवास करतात. मात्र बोगदा लहान असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे संबंधितांनी राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागात महामार्गावरील बोगद्याचे रुंदीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी खासदार प्रियांका जारकीहोळी यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, निपाणी उपनगरात जाणाऱ्या रहिवाशांची संख्या सुमारे १५ ते १६ हजार आहे. परिसरात गटशिक्षणाधिकारी कार्यालय, मंगल कार्यालय, महादेव मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर यांसारखी प्रार्थनास्थळेही आहेत. त्यामुळे निपाणी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक येथे नियमितपणे येतात. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला न्यायालय, भाजी बाजार, रविवारचा आठवडी बाजार, अग्निशमन केंद्र आहे. शिवाय सरकारने महामार्गाच्या दोन्ही बाजू व्यावसायिक क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे, दोन्ही बाजूंच्या व्यावसायिक आस्थापनांसजह सर्वांची गैरसोय होत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन या बोगद्याची रुंदी किमान दोन-चार चाकी वाहने जाण्यासाठी आणि विशेषतः अनेक पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशी असावी‌‌. जेणेकरून वृद्ध, अपंग, शाळेत जाणारी मुले आणि इतर पादचारी कोणत्याही अडथळ्याशिवाय फिरू शकतील. महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्यावर बांधलेल्या नाल्यांमधील पाण्याला चर करून द्यावी. सध्या निवासी भागातील घरांमध्ये पावसाचे शिरत आहे. हे पाणी सुमारे १ ते १.५ किलोमीटर अंतरावरून मोठ्या प्रमाणात येत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना डास आणि इतर कीटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ते पाणी सेवा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या खड्ड्यात त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहील, असेही म्हटले आहे.
टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांच्या हस्ते खासदार प्रियंका जारकीहोळी यांना सदरचे निवेदन देण्यात आले. त्यांन निवेदन स्वीकारून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सुप्रिया पाटील, झाकीर कादरी, प्रा. डॉ. आर. के. दिवाकर, विनोद बल्लारी, रवींद्र श्रीखंडे, फारुख गवंडी, सागर पाटील, एस. एम‌. चिमगावे, विकास कदम, सुहास कांबळे, एस. एस. चव्हाण, एन. डी. येरुडकर यांच्यासह प्रगती नगर शाहूनगर आंदोलन नगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *