नानपारा : लखीमपूर महामार्गावर नैनिहाजवळ रविवारी पहाटे एका वेगवान ट्रक आणि ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. नऊ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोतीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …
Read More »बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षांची शिक्षा
नवी दिल्ली : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना ४ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आज (दि.२७) ठोठावली. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि प्रकरण जुने असल्याने सहानुभूती मागितली होती. दरम्यान, न्यायालयाने ओमप्रकाश चौटाला यांना तीन वर्षांपेक्षा जास्त काळ …
Read More »जम्मू-काश्मीर : २४ तासांत ६ दहशतवाद्यांचा खात्मा
कुपवाडा (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न सुरूच आहेत. याच दरम्यान गुरूवारी (दि. २६) रोजी सकाळी कुपवाडा जिल्ह्यात घुसखोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. यामुळे गेल्या २४ तासात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि मोठा दारूगोळ्या, इतर …
Read More »हृदयद्रावक! सेनेगल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू
आफ्रिकेच्या सेनेगलमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 11 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. या दुर्दैवी घटनेनंतर सेनेगलचे अध्यक्ष मॅकी सॅल यांनी बुधवारी रात्री उशिरा सांगितलं की, ‘पश्चिम सेनेगल शहरातील तिवौनेमधील रुग्णालयात आगीमुळं 11 नवजात बालकांचा मृत्यू झालाय.’ यादरम्यान, पश्चिम आफ्रिकन देशातील आरोग्य व्यवस्थेबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेनेगलमध्ये …
Read More »काश्मीरमध्ये सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या; १० वर्षाचा भाचा जखमी
जम्मू : जम्मू काश्मीरमधील बडगम जिल्ह्यात एका ३५ वर्षीय सोशल मीडिया स्टारची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात महिलेचा १० वर्षाचा भाचा जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केला. “रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांना घरात घुसून अमरिन भटवर गोळीबार केला. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात …
Read More »चारधाम यात्रेसाठी निघालेल्या गाडीत सिलिंडरचा स्फोट; ६ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये बुधवारी (ता. २५) चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या सहा प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला. टिहरी जिल्ह्याजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी स्वयंपाकासाठी गाडीत गॅस सिलिंडर ठेवला होता. सिलिंडरमध्ये स्फोट झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती टिहरीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातात प्राण गमावलेले सर्व प्रवासी हे पश्चिम बंगालचे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त …
Read More »ओडीसातील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी
भुवनेश्वर : ओडीशाच्या गंजाम गावामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला, तर चाळीसहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, हा अपघात बसचा ब्रेक निकामी झाल्याने किंवा बसचा चालक नवीन असल्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या …
Read More »मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल
पुणे : कडक उन्हामुळे सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मान्सूनला देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे २७ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात …
Read More »ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता जलदगती न्यायालयात; ३० मे रोजी सुनावणी
नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्याकडे सोपवले. या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे. शिवलिंगाची पूजा करण्याची मागणी मंगळवारी दिवाणी न्यायाधीश रवी …
Read More »टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपेची शिक्षा
नवी दिल्ली :टेरर फंडिंग प्रकरणात एनआयए कोर्टात दोषी ठरलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मलिकला किती शिक्षा होणार यावर चर्चा झाली. या प्रकरणी एनआयएने यासिनला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. संध्याकाळी ६ नंतर न्यायालय निर्णय देणार आहे. १९ मे रोजी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta