Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

मुख्तार अब्बास नक्वी यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली : मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केंद्रीय अल्‍पसंख्‍याक मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्‍यापूर्वी त्‍यांनी भाजप अध्‍यक्ष जे. पी. नड्‍डा यांची त्‍यांनी भेट घेतली. दरम्‍यान, नक्‍वी यांना लवकर मोठी जबबादारी देण्‍यात येईल, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरु आहे. मात्र याबाबत नक्‍वी यांनी अधिकृतपणे विधान केलेले नाही. नक्‍वी हे राज्‍यसभा …

Read More »

कोरोनावरील देशातील पहिली टॅबलेट ‘सीडीएल’च्‍या परीक्षणात पास, आता होणार क्‍लीनिकल ट्रायल

नवी दिल्ली : कोरोना रुग्‍णसंख्‍येमधील चढ-उतार कायम असताना एक गूड न्‍यूज समोर आली आहे. देशातील पहिली कोरोनावरील टॅबलेट ही केंद्रीय औषध प्रयोगशाळाने (सीडीएल) घेतलेल्‍या गुणवता आणि क्षमता परीक्षणात पास झाली आहे. आता या टॅबलेटची क्‍लिनिकल ट्रायल होणार असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोनावरील टॅबलेट ही बंगळूरमधील सिनजिन कंपनीने अमेरिकेवरुन आयात केली …

Read More »

सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका! घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

नवी दिल्ली : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. १४.२ किलो वजनाचा घरगुती वापराचा गॅस सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत या सिलिंडरचा दर आता १,०५३ रुपयांवर पोहोचला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. तर ५ किलो वजनाचा घरगुती गॅस सिलिंडर १८ रुपयांनी महागला …

Read More »

शिकागो गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू, 59 जखमी

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी व्यक्त केलं दु:ख शिकागो : अमेरिकेत शिकागोमध्ये 4 जुलै रोजी स्वातंत्र्य दिनाच्या परेडवर झालेल्या गोळीबारात 9 लोकांचा मृत्यू झाला असून 59 लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली आहे. या घटनेवर राष्ट्रपती जो बायडन यांनी शोक व्यक्त केला आहे. दरम्यान हायलँड पार्कमध्ये गोळीबाराचा आरोपी असलेल्या …

Read More »

उद्धव ठाकरेंची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला दिलं आव्हान

नवी दिल्ली : राज्यातील सत्तानाट्य पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहचलं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे नियुक्त शिवसेनेच्या मुख्य प्रतोदच्या व्हीपला मान्यता देण्याचा नवनिर्वाचित महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षांच्या कार्यवाहीला याचिकेतून आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष वरिष्ठ वकील अभिषेक मनु …

Read More »

हिमाचल प्रदेश : कुल्लू येथे बस दरीत कोसळून शाळकरी मुलांसह ११ ठार

शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात शाळकरी मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला. कुल्लूमधील सेंज व्हॅलीमध्ये सकाळी ८ वाजता हा अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे. कुल्लू जिल्ह्यातील सेंजला जाणारी बस सकाळी ८ वाजता जंगला गावाजवळ दरीत कोसळली. या बसमध्ये …

Read More »

‘हिंदूंव्यतिरिक्त इतर समुदायांपर्यंत पोहोचा’, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पक्षाला आवाहन

हैदराबाद : मागील काही वर्षापासून भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षांनी अनुसरलेल्या घराणेशाही आणि कुटुंबाभिमुख राजकारणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाला हिंदूंव्यतिरिक्त इतर वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचण्याचं आवाहन केलं आहे. “इतर समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न …

Read More »

उपराष्‍ट्रपती निवडणूक : कॅप्टन अमरिंदर सिंग ‘एनडीए’चे उमेदवार

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची ‘एनडीए’च्या उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ ११ ऑगस्ट रोजी संपत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ५ जुलै रोजी अधिसूचना जारी झाल्यानंतर १९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरली जाणार आहेत. कॅप्टन …

Read More »

’आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच’, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हैद्राबाद : : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा …

Read More »

कडेकोट बंदोबस्तात पुरी रथयात्रेला सुरुवात, रथयात्रेत लाखो भाविक होणार सहभागी!

पुरी : जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरु होऊन, 12 जुलैपर्यंत चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी पूजा विधी सुरु झाले आहेत. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरी मंदिर ते रथयात्रा मार्ग आणि …

Read More »