जम्मू : कुपवाडा येथील जुमागंड परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये आज (दि.१६ जून) सकाळी चकमक झाली. या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहेत. हे सर्व दहशतवादी परदेशी असून, शोधमोहिम सुरू आहे, अशी माहिती काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी चकमकीत २ दहशतवादांचा खात्मा यापूर्वी 13 …
Read More »भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अखेर आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अखेर आज (दि.१५ जून) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बृजभूषण यांच्यावर कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून आरोपत्र दाखल करण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. कुस्तीपटूंनी दिलेल्या …
Read More »तामिळनाडूमध्ये परवानगीशिवाय सीबीआय तपास करू शकणार नाही; स्टॅलिन सरकारचा मोठा निर्णय
तामिळनाडूचे मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीनं छापे टाकल्यानंतर स्टॅलिन सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली संमती काढून घेण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारच्या निर्णयानुसार, आता केंद्रीय यंत्रणांना राज्यात कोणत्याही प्रकरण्याचा तपास करायचा असेल तर, सर्वात आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तामिळनाडूच्या …
Read More »आधी कोंबडी की अंड? ज्या प्रश्नानं लहानपणापासून गोंधळवलं, त्याचं अखेर शास्त्रज्ञांनी उत्तर शोधलं
लहानपणापासूनच आपण सर्वांनी एक प्रश्न नक्कीच ऐकला आहे. तो म्हणजे, कोंबडी आधी की, अंडी? पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या लहानपणापासून अनुत्तरित असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आता शास्त्रज्ञांनी शोधलं आहे. तुम्हालाही याचं उत्तर ऐकायची उत्सुकता नक्कीच असेल की, या पृथ्वीवर सर्वात आधी कोण आलं? कोंबडी की, अंड? ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या …
Read More »दक्षिण ग्रीसच्या समुद्रात नौका बुडाली, ७९ जणांचा मृत्यू; १०४ जणांना वाचवण्यात यश
दक्षिण ग्रीसच्या समुद्र तटावर शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारी नौका बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १०४ लोकांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही बचाव कार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांचा ड्रोनने शोध घेतला जात आहे. काल बुधवारी सकाळी ही घटना घडली. दुर्घटनेतून वाचवण्यात आलेल्या लोकांना …
Read More »हैदराबादच्या महिलेची लंडनमध्ये चाकू भोसकून हत्या
लंडन : लंडनमधील वेम्बली येथे हैदराबादमधील एका २७ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेल्या कोन्थम तेजस्विनीची हत्या एका ब्राझिलियन व्यक्तीने केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता तेजस्विनी सह तिच्या आणखी एका रुमेटवर या ब्राझिलियन व्यक्तीने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या …
Read More »बंगळुरू-हुबळीसह 5 ‘वंदेभारत एक्सप्रेस’ना एकाच दिवशी हिरवा झेंडा
नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत. धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना …
Read More »नायजेरियात बोट उलटली; १०० जणांच्या मृत्यूची भीती
नायजेरियामध्ये सोमवारी पहाटे नायजर नदीत बोट उलटून शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएनएनने स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एएनआयने याची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोटीवर ३०० लोक होते. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हा …
Read More »लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; निवडणुकांच्या रिंगणात उतरणार सर्व केंद्रीय मंत्री
नवी दिल्ली : आगामी काळातील लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. संघाकडून मिळालेल्या सल्ल्यांनंतर राजकीय समिकरणांबरोबरच जातीय समिकरणे सुधारण्याचे प्रयत्न सध्या भाजपकडून करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. यादरम्यान पक्ष नेतृत्वाकडून एक मोठा निर्णय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याची माहिती सध्या मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व मंत्री …
Read More »जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे ५.४ तीव्रतेचा भूकंप; दिल्लीसह उत्तर भारतातही धक्के
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये आज ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. एचपी, चंदीगड, पंजाब आणि सर्व लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले असावेत. कदाचित आफ्टरशॉक मुख्य धक्क्यापेक्षा कमी तीव्रतेचा असेल, अशी माहिती डॉ. ओपी मिश्रा, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी दिली आहे. या भूकंपाचे धक्के दिल्ली आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta