Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

मुलायम सिंह यादव यांचे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांचं गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण …

Read More »

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले

  शिवसेना पक्षाचे नावही वापरता येणार नाही नवी दिल्ली  : उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. …

Read More »

बांग्लादेशमधील मंदिरात अज्ञातांकडून तोडफोड, देवीच्या मूर्तीची विटंबना

  ढाका : बांग्लादेशमध्ये पुन्हा एकदा मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी पश्चिम बांग्लादेशातील एका मंदिरात तोडफोड आणि देवीच्या मूर्तीची विटंबना केली आहे. पोलीस या व्यक्तींचा शोध घेत आहेत. बांग्लादेशातील झेनाइदह जिल्ह्यातील दौतिया गावातील कालीमाता मंदिराच्या अधिकार्‍यांना मंदिरात मूर्तीचे काही तुकडे दिसले आणि मंदिरापासून काही अंतरावर …

Read More »

थायलंडच्या बाल संगोपन केंद्रात गोळीबार; 22 मुलांसह 34 जण ठार

  थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात माजी पोलिस कर्मचार्‍याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत झाला. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलिस कर्मचार्‍याने रक्तपात केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला. पोलिस उपप्रवक्ते अर्कोन क्रेटोंग यांनी रॉयटर्सला माहिती देताना सांगितले की, या घटनेत तब्बल 32 जणांचा …

Read More »

अमेरिकेत भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

  कॅलिफॉर्निया : भारतीय वंशाच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियातील एका फळबागेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आठ महिन्यांच्या मुलीचा देखील समावेश आहे. हे कुटुंब काही दिवसांपासून बेपत्ता होते, अशी माहिती ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. आठ महिन्यांच्या आरोही धेरीसह तिची आई 27 वर्षीय जसलीन कौर आणि वडील जसदीप …

Read More »

केरळ येथे दोन बसची समोरासमोर धडक; 9 ठार

  तिरुअनंतपुरम : केरळ राज्य परिवहन बसला पर्यटक बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केरळमधील पलक्कड येथे हा अपघात झाला. पर्यटक बस बसेलियस विद्यानिकेतन शैक्षणिक संस्थेतून विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटीला जात होती. यावेळी हा अपघात झाला. पोलिसांनी …

Read More »

दुर्गामाता विसर्जनावेळी नदीला अचानक पूर 7 जणांचा मृत्यू

  कलकत्ता : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गामुर्ती विसर्जना वेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल (दि.06) बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माल नदी परिसरात घडली. दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा

  शोपियान (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी ४ स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. पहिली चकमक द्राच भागात झाली. या ठिकाणी तिघा दहशतवाद्यांना मारण्यात आले. हे तिघेजण स्थानिक असून ते दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि …

Read More »

मातृशक्तीचा सन्मानही आवश्यक : मोहन भागवत

  नागपूर : डॉ. हेडगेवार यांच्या काळापासून आरएसएसच्या कार्यक्रमात महिलांचा सहभाग आहे. अनसूया काळे यांच्यापासून अनेक महिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. आपल्याला निम्म्या लोकसंख्येला सन्मान आणि योग्य सहभाग द्यायचा आहे. ‘माणूस जे काही करू शकतो, ते सर्व काम मातृशक्तीनेही होऊ शकते. पण स्त्रिया करू शकतील असे सर्व …

Read More »

बस दरीत कोसळून ३२ प्रवाशांचा मृत्यू, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

  पौडी गढवाल : उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस वऱ्हाडींना घेऊन हरिद्वारमधील लालढांग येथून काडागावकडे जात होती. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत पडली. पौरी गढवाल जिल्ह्यातील बीरोखाल भागात रात्री …

Read More »