पाटणा : बिहारमधील दरभंगा येथे दोनदिवसीय बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या बिहार यूनिटने रविवारी जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांच्यासोबत परत कधीच आघाडी न करण्याचा ठराव मंजूर केला. राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांनी ठरावास दुजोरा देत म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …
Read More »बलात्कार प्रकरणी स्वयंघोषित संत आसाराम बापू दोषी; कोर्ट उद्या शिक्षा सुनावणार
नवी दिल्ली : स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणाता दोषी आढळला आहे. गुजरातमधील गांधीनगर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून उद्या आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. भारतात कधीकाळी आसाराम बापू हा मोठा अध्यात्मिक गुरू होता. आसारामच्या सत्संगमध्ये …
Read More »शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा शेवटचा डाव
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष कोणाचा, पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद सुरू आहे. या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ठाकरे गटाने आज लेखी स्वरुपात आपलं म्हणणं सादर केले. कुठल्याही पातळीवर तपासलं …
Read More »ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन; पोलिस अधिकाऱ्यानं केला होता गोळीबार
ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि बिजू जनता दल (बीजेडी) ज्येष्ठनेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले होते. …
Read More »मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 कोसळले, एका पायलटचा करुण अंत
भारतीय वायुसेनेची (IAF) दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज-2000 मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात शनिवारी सकाळी नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळली. या भीषण अपघातात लढाऊ सुखोई विमानातील दोन पायलट सुदैवाने वाचले, पण मिराजमधील पायलटचा करुण अंत झाला. अपघात नेमका कसा घडला? सुखोई-30 आणि मिराज-2000 या दोन्ही अपघात झालेल्या विमानांनी आज सकाळी …
Read More »झाकीर हुसेन, सुधा मूर्ती, रविना टंडन यांना पद्म पुरस्कार जाहीर, एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा
नवी दिल्ली : भारत सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी केंद्र सरकारने एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते मुलायमसिंह यादव तसेच ओआरएसचे निर्माते दिलीप महालनाबिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर ९१ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एकूण …
Read More »नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के; ५.८ रिश्टर स्केलच्या तीव्रतेनं हादरला परिसर, एकाचा मृत्यू
काठमांडू : नेपाळच्या पश्चिम भागात ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून एकजणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू सुदूर-पश्चिम प्रांतातील बाजुरा जिल्ह्यातील मेळा भागात होता. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भारतात दिल्ली व जयपूरच्या काही …
Read More »अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांचं सत्र सुरुच; एकाच दिवसांत दोन घटना, नऊ जण ठार
गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अमेरिकेतून गोळीबाराच्या घटना समोर येत आहेत. कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी (23 जानेवारी) झालेल्या गोळीबारात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, पोलिसांनी या घटनेतील संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सॅन मेंटो येथील पोलीस मुख्यालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 30 मैल अंतरावर हाफ मून बेजवळ एका महामार्गावर गोळीबाराची घटना …
Read More »अमेरिकन सैन्याचा सोमालियात एअर स्टाईक, अल शबाबचे 30 सैनिक ठार
न्यूयॉर्क : सोमालियामध्ये सरकारी सैनिकांना मदत करणाऱ्या अमेरिकन हवाई हल्ल्यात सुमारे ३० इस्लामी अल-शबाब दहशतवादी ठार झाले आहेत, असे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे. हा हल्ला शुक्रवारी (दि.२१) सोमालियातीस गलकाडच्या मध्य सोमाली शहराजवळ झाला. राजधानी मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 260 किमी (162 मैल) अंतरावर असलेल्या गालकाड शहराजवळ हा हल्ला झाला. गेल्या …
Read More »गोव्याकडे येणार्या प्रवासी विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, विमान उझबेकिस्तानला वळवलं!
पणजी : रशियातील मॉस्कोहून गोव्याच्या दिशेने येणारं विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीचा इ-मेल गोल्यातील डाबोलिम विमानतळ प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पावलं उचलंत हे प्रवासी विमान उझबेकिस्तानच्या दिशेने वळवलं आहे. या विमानावर तब्बल 240 प्रवासी होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta