नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. 22 ऑगस्टला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. पण, निवडणूक आयोगाने 19 तारखेपर्यंत मुदत दिल्यामुळे शिवसेनेने सुनावणी घेण्याची विनंती केली. पण सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची मागणी फेटाळली असून वेळेवरच सुनावणी होणार आहे. शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर …
Read More »पहलगाममध्ये आयटीबीपीची बस नदीत कोसळली; 6 जवान शहीद
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. …
Read More »इजिप्तमधील चर्चमध्ये अग्नितांडव : ४१ जणांचा मृत्यू, १४ जखमी
इजिप्तमधील गिझा शहरात आज (दि.१४) एका चर्चमध्ये लागलेल्या आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बहुतांश लहान मुले आहेत. गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे. इम्बाबा परिसरातील कॉप्टिक अबू सिफिन चर्चमध्ये पाच हजारांहून अधिक जण रविवारच्या प्रार्थेनेनिमित्त जमले होते. …
Read More »लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला
न्यूयॉर्क : वादग्रस्त लेखनाबद्दल इराणकडून मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर पश्चिम न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला झाला आहे. शुक्रवारी रात्री करण्यात आलेल्या या हल्ल्यात रश्दी जखमी होऊन कार्यक्रमस्थळीच कोसळले. हल्लेखोराला लगेच ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती कितपत गंभीर आहे हे लगेच कळू शकले नाही. चौताकुआ इन्स्टिट्यूशन या संस्थेतर्फे …
Read More »उत्तर प्रदेशात बोट उलटून 30 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले
उत्तर प्रदेशमधील बांदा येथे गुरुवारी दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. बोटीत 30 हून अधिक लोक होते. यातील चार जण कसेतरी पोहत नदी काठी पोहचले. पोलीस प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. एसडीआरएफचेही पथक बुडालेल्या लोकांचा …
Read More »टीएमसीच्या आणखी एका नेत्यावर घोटाळ्याचे आरोप, सीबीआयने केली अटक
कोलकात्ता : प्राण्यांच्या तस्करी प्रकरणी न्यायालयात टीएमसीचे बीरभूम जिल्हाध्यक्ष अनुब्रत मंडल यांना 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सीबीआयने अनुब्रत मंडल यांना आज आसनसोल येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. सीबीआयने 14 दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने 10 दिवसांची कोठडी दिली आहे. टीएमसी नेत्याला प्राण्यांच्या तस्करीच्या एका प्रकरणात अटक …
Read More »अर्थव्यवस्था ढासळत असताना राजकारण्यांनी आश्वासनांची खैरात करणं चिंताजनक : सर्वोच्च न्यायालय
नवी दिल्ली : निवडणुका आल्या की नेतेंडळी जनतेला मोठ्या प्रमाणावर आश्वासनं देत असतात. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होतो. वीजबिल माफी, मोफत दिल्या जाणार्या वस्तू वगैरे आश्वासनं तर अगदी नेहमीची वाटावी इतकी सर्रासपणे दिली जातात. मात्र, अशा प्रकारे मोफत वस्तू वाटप वगैरे दिल्यामुळे त्याचा देशावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असं …
Read More »जगदीप धनकड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
नवी दिल्ली : देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकड यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांनी ही शपथ घेतली. अलिकडेच पार पडलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार धनकड यांनी विरोधी गोटाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. धनकड …
Read More »स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी राजौरीतील लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे दोन जवान जखमी जम्मू झोनचे …
Read More »मुख्यमंत्री नितीश कुमार 24 ऑगस्टला विश्वासदर्शक ठराव मांडणार!
पाटणा : बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. आज नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. याच मंत्रिमंडळ बैठकीत 24 ऑगस्टला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारच्या नव्या सरकारमध्ये 24 आणि 25 ऑगस्टला बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta