Sunday , July 26 2026
Breaking News

नितीन गडकरींच्याच विरोधात ‘सीबीआय’चा वापर होऊ शकतो : कन्हैय्या कुमार

Spread the love

 

नागपूर :  “सध्या भाजपमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे. एखाद्या दिवशी गडकरींच्याच विरोधात सीबीआयचा वापर होऊ शकतो.”, अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज (शनिवार) नागपुरात व्यक्त केली.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेत्यांनी तंत्रज्ञान यात्रेचे आयोजन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार नागपुरात आले असता ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावर कन्हैय्या कुमार यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, “ ‘युवा है जोश में, लायेंगे इन्हे होश में’ या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम केले जात आहे. आज देशासमोर बेरोजगारी, महागाईचे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. हे सर्व थांबवायचे आहे. त्यासाठी लोकांना एकत्रित करण्याकरिता ही रॅली काढण्यात आली आहे.”

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *