नवी दिल्ली : राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्टा काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असता उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसर्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. तर शिंदे गटाने …
Read More »सोनिया गांधी व राहुल गांधींच्या चौकशीनंतर नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर छापा टाकला आहे. नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून दिल्लीतील अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सध्या नॅशनल हेराल्डच्या चौथ्या मजल्याची ईडीकडून झडती घेतली जात आहे. याच मजल्यावर वृत्तपत्राचं कार्यालय आहे. …
Read More »माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या
आंध्रप्रदेश :आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांची मुलगी के. उमामहेश्वरी यांनी सोमवारी जुबली हिल्स येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उमामहेश्वरी या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजाराला कंटाळून उमामहेश्वरी यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
Read More »गळे कापणार्या जिहाद्यांपासून स्वत:ला आणि कुटुंबाला वाचायचे असेल, तर हिंदूंनी आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल! : टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा
नवी दिल्ली : नुपूर शर्माचे समर्थन केले म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये हिंदूविरोधी शक्तींकडून हिंदूंच्या गळे कापून हत्या केल्या जात आहेत. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती यांच्यात युद्धाला आरंभ झालेला आहे. युद्धाचा बिगुल वाजलेला आहे. हिंदू जर ‘सेक्युलर’ राहिला, तर तो आणि त्याचा परिवार वाचणार नाही. सरकार आणि …
Read More »संजय राऊत ईडीच्या ताब्यात
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. खासदार संजय …
Read More »महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत उद्या होणारी सुनावणी आता 3 ऑगस्टला!
नवी दिल्ली : शिवसेना पक्षावर कोणाचा दावा खरा आहे, हे पाहण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला नोटीस बजावली होती. निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र आता ही …
Read More »हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू
भीमडा : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये बारमेर परिसरात सैन्य दलाचे ‘मिग’ हे लढाऊ विमान गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कोसळून या दुर्घटनेत दोन्ही पायलटचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर आगीचे मोठे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. त्यामध्ये विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे आणि …
Read More »खा. शेवाळेंच्या लोकसभा गटनेतेपदी नियुक्तीविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच खासदार राजन विचारे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी अवैधरित्या तसेच एकतर्फी निर्णय घेत लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद …
Read More »’सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण सुरू! : डॉ. नील माधव दास
पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्याला मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला. तेव्हापासून शालेय पाठ्यपुस्तकांत अकबर, टीपू सुलतान आदी मुसलमान आक्रमकांचे धडे शिकवले जाऊ लागले. ते आजपर्यंत चालूच आहे. एकूणच ‘सेक्युलर’ शब्दाच्या आड शिक्षण क्षेत्राचे इस्लामीकरण चालू आहे. हा शिक्षण जिहादच आहे. जोपर्यंत भारत संवैधानिक …
Read More »अखेर पार्थ चॅटर्जींना मंत्रीपदावरून हटवले
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची कारवाई कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रीपदावरून हटवले आहे. ईडीच्या अटकेनंतर पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपदावरून हटवण्याची मागणी होत होती. दरम्यान, आज ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर काही वेळातच त्यांना मंत्रिपदावरून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta