Sunday , July 26 2026
Breaking News

देश/विदेश

देशात दुसर्‍यांदा टाकलेल्या छाप्यात पीएफआयचे 247 जण ताब्यात

  नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज दुसर्‍यांदा पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह काही राज्यांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत 247 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात 44, कर्नाटकात 72, आसाममध्ये 20, दिल्लीत 32, महाराष्ट्रात 43, …

Read More »

आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

  पुणे : केंद्र सरकारकडून ’दादासाहेब फाळके पुरस्कार 2020’ जाहीर करण्यात आला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी याबाबत घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख ठरल्या आहेत. ठाकुर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार केंद्रीय माहिती …

Read More »

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

  पटियाला : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिनला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलं होतं. सक्तवसुली संचालनालयाने ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट’ नुसार सुकेश चंद्रशेखरवर गुन्हा दाखल …

Read More »

ऐन सणासुदीत गॅस दरवाढीचा भडका उडणार!

  नवी दिल्ली : जनतेच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. आता नागरिकांना गॅस महागाईचा फटका बसण्याची चिन्ह आहेत. या आठवड्यात होणार्‍या पुनरावलोकनानंतर नैसर्गिक वायूच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नैसर्गिक वायूचा वापर वाहनांसाठी वीज, खते आणि सीएनजी निर्मितीसाठी केला जातो. यामुळे नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजीचे …

Read More »

हिमाचल प्रदेशमधून टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 7 ठार

  कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ हा अपघात झाला आहे. एक टेम्पो …

Read More »

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांकडून गोळीबार; आतापर्यंत ५० जणांचा मृत्यू

तेहरान : इराणमध्ये हिजाब व्यवस्थित न घातल्याने ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यापासून मोठे आंदोलन पेटले आहे. महिलांकडून हिजाबला विरोध केला जात आहे. आंदोलनाला १० दिवस उलटल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणीचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची आग अधिकच भडकली आहे. या तरुणीचं नाव हदीस नजफी असल्याचं …

Read More »

राष्ट्रपती मुर्मू आजपासून तीन दिवस कर्नाटक दौऱ्यावर

  बंगळूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (ता. २६) राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच कर्नाटकात येणार्‍या द्रौपदी मुर्मू उद्या म्हैसूर येथील चामुंडी हिल येथे ऐतिहासिक दसरा उत्सवाचे उद्घाटन करतील, असे राष्ट्रपती भवनाने रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे. हुबळी येथे हुबळी-धारवाड महानगरपालिकेने आयोजित केलेल्या नागरी सन्मान कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या …

Read More »

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्यांना नोटीस; ईडीने तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या नेत्यांना चौकशीसाठी बोलावले

  नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधील काही काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावली आहे. त्यांना पुढील आठवड्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. अधिकार्‍यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. याप्रकरणी ईडीने यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी …

Read More »

चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयकडून 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने शनिवारी 20 राज्यांतील 56 ठिकाणी छापे टाकले. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या ऑपरेशनचे नाव मेघदूत होते. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक टोळ्यांची ओळख पटली आहे, ज्या चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित कंटेन्ट वापरत नाहीत तर मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करतात. या टोळ्या गटाने …

Read More »

पीएफआयने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण; अनेक ठिकाणी दगडफेक

  पीएफआय विरोधात केरळ हायकोर्टाचे कठोर पाऊल तिरुअनंतपुरम : केरळमध्ये कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने शुक्रवारी संप केला. केरळ बंद दरम्यान दगडफेक आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. केरळ उच्च न्यायालयाने या घटनांची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने कठोरपणा दाखवत संपावर बंदी घातली आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान सहन केले …

Read More »