Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

बेळगाव इलेव्हन संघ विभागीय हॉकी स्पर्धेत उपविजेता

  बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, गदग यांच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा गेम्स २०२५ (हॉकी) महात्मा गांधी हॉकी स्टेडियम, बेटगेरी-गदग येथे झालेल्या बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेच्या हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. सदर हॉकी स्पर्धेत बेळगाव इलेव्हन संघाने डी वाय एस …

Read More »

मराठा समाजाच्या हितोन्नतीसाठी बेंगळुरूमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

  बेंगळूर : मराठा समाजातील मान्यवरांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी …

Read More »

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव सोसायटीच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण

  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी ठिक सकाळी 11 वा. शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तीना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी तर चिटणीसपदी सुरेन्द्र देसाई यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी सदस्यांची बैठक विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुढील पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडण्यात आले. उपाध्यक्ष के.एल. मजूकर, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली!

  येळ्ळूर : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळर’च्यावतीने सीमासत्याग्रही कै. सुभाष यल्लोजी कदम, पैलवान कै. गोविंद वासुदेव कुगजी, हाडाचे वैद्य कै. परशराम ओमाण्णा धामणेकर, निवृत्त शिक्षक कै. चांगदेव भरमाजी उडकेकर, मारुती नागोजी उघाडे, कै. लक्ष्मीबाई गुंडू गोरल, कै. राजाराम सुबराव पाटील, कै. अनंत यल्लापा पाटील, भारतीय सैनिक कै. राहुल आनंदा गोरल …

Read More »

“महाराष्ट्र राज्य” फलक येळ्ळूर : आज चौथ्या खटल्याचा निकाल

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती,  याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद …

Read More »

सीमाभागात मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सोपी करावी

  रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची भेट बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधीची अंमलबजावणी सीमाभागात अधिक सोपी करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्याकडे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या चर्चेत सीमाभागातील रुग्णांना तातडीने आणि सुलभतेने मदत मिळावी यासाठी प्रणाली सुधारण्याबाबत विचारविनिमय …

Read More »

सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची लवकरच बैठक; तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय

  सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी यासाठी प्रयत्न करणार बेळगाव : महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याला जलद गती मिळावी. याचिका मुख्य पटलावर घेण्यात यावी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन तात्काळ उच्चाधिकार समितीची बैठक घेण्याचा निर्णय मुंबईत मंत्रालयात आयोजित तज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या …

Read More »

मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढलेल्या ऑटो चालकाची आत्महत्या

  बेळगाव : बुधवारी बेळगावातील किल्ला तलावात एका ऑटो चालकाने उडी मारून जीवन संपवले. मृत व्यक्तीची ओळख बेळगावच्या कंग्राळी येथील किरण मनगुतकर (५४) अशी झाली आहे.किरण मनगुतकर यांनी एक वर्षापूर्वी मुलीचे लग्न केले होते. ते अत्यंत प्रामाणिक होते आणि सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे …

Read More »