बेळगाव : पोक्सो प्रकरणात साक्ष देऊ नये म्हणून साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना बेळगावमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात उद्यमबाग पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय परशुराम नेकनार (वय ३६, रा. शांतीसागर कॉलनी, मजगाव, बेळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पिरनवाडी क्रॉस परिसरात ‘परशुराम किचन वेअर’ …
Read More »डी. के. शिवकुमार सरकारमध्ये बेळगावला किती मंत्रिपदे मिळणार? आमदारांची मंत्रिपदावर नजर..!
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात सत्तेच्या नव्या समीकरणांची चर्चा रंगली असून, नव्या मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्याला किती प्रतिनिधित्व मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील अनेक काँग्रेस आमदारांनी मंत्रीपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बैलहोंगल मतदारसंघाचे तीन वेळा आमदार महंतेश कौजलगी आणि रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी मंत्रीपदासाठी जोरदार …
Read More »उत्तर विभाग आयजीपी संदीप पाटील यांनी स्वीकारला पदभार
बेळगाव : वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांनी गुरुवारी उत्तर विभागाचे नवीन आयजीपी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी संदीप पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. बेळगाव मुख्यालय असलेल्या उत्तर विभागाच्या पोलीस प्रशासनातील हा महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 30 रोजी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 30 मे 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
Read More »केएचएमए, बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे 31 रोजी पदग्रहण, वैज्ञानिक परिषद
बेळगाव : कर्नाटक होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन (केएचएमए), बेळगाव शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ व वैज्ञानिक परिषद येत्या रविवार दि. 31 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गांधी भवन, हॉटेल सन्मान जवळ, बेळगाव येथे संपन्न होणार होणार आहे. सदर कार्यक्रमात संघटनेच्या डॉ. व्ही. व्ही. वेर्णेकर (अध्यक्ष), डॉ. सोनाली सरनोबत (कार्याध्यक्ष), …
Read More »नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून तरुणाची निर्घृण हत्या
दोन संशयित ताब्यात कागवड (प्रतिनिधी) : कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात नारळ विक्रीच्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ऐनापूर आणि उगार परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाची ओळख संतोष सिद्धप्पा कामटे (वय ३३, रा. ऐनापूर) अशी झाली आहे. मिळालेल्या …
Read More »मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; राज्यपालांच्या मुख्य सचिवांकडे पत्र सुपूर्द
बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांच्या मुख्य सचिवांकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावर मंगळवार आणि बुधवारी दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या महत्त्वाच्या …
Read More »बेळगाव-गोवा महामार्गावर भीषण अपघात; 2 ठार
बेळगाव : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर-अनमोड घाट मार्गावर गवेगाळी क्रॉस येथे बुधवारी मध्यरात्री कार आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जण जागीच ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पासिंगची कार (एपी 02 बीएएन 0292) गोव्याहून कर्नाटकच्या दिशेने येत होती. त्याचवेळी …
Read More »बैलूर क्रॉसजवळ दरोडा; 30 लाखांचे सोने लंपास, 8 आरोपी अटकेत
बेळगाव : बेळगाव-चोर्ला मार्गावरील बैलूर क्रॉस परिसरात चित्रपटालाही लाजवेल असा थरारक दरोडा घडल्याने खानापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत पश्चिम बंगालमधील तीन सुवर्णकारांना लुटून तब्बल 30 लाख रुपयांचे सोने व रोख रक्कम लंपास करण्यात आली. या प्रकरणी खानापूर पोलिसांनी वेगाने तपास करत आठ आरोपींना अटक …
Read More »जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; बेळगाव हादरले
बेळगाव : जयनगर-हुंचेनहट्टी परिसरात बुधवारी सायंकाळी एका 23 वर्षीय तरुणाची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आर्थिक व्यवहाराच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राहुल तिप्पाण्णा तळवार (रा. तानाजी गल्ली, मजगाव) असे मृत तरुणाचे नाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta