Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची 11 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नी पुढील भूमिका निश्चित करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक बुधवार, दि. 8 जुलै रोजी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा घेऊन पुढील रणनीती, आंदोलनाची दिशा आणि सीमाभागातील घडामोडींवर सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

या बैठकीत सीमावादासंदर्भातील अलीकडील घडामोडी, राज्य सरकारची भूमिका तसेच मराठी भाषिकांच्या हक्कांबाबत पुढील निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सर्व सभासदांनी वेळेवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *