Sunday , September 20 2026
Breaking News

काँग्रेस रोडवरील नाला तुंबल्याने पूरस्थितीचा धोका; तक्रार करूनही प्रशासनाकडून कारवाई नाही

Spread the love

 

बेळगाव : काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरासमोरील उड्डाणपुलाखाली असलेल्या नाल्याच्या बोगद्याच्या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा अडकून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाधित झाला आहे. याबाबत सकाळी 8.00 वाजता संबंधित प्रशासनाला माहिती देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे हा अडथळा तातडीने दूर न केल्यास मराठा कॉलनी, नानावाडी आणि विवेकानंद कॉलनी परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि माजी सैनिकांनी तातडीने नाल्यात अडकलेला प्लास्टिक कचरा हटवून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने विलंब न करता आवश्यक यंत्रणा घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही बाब श्री. सुधाकर चालके (निवृत्त सुभेदार, भारतीय सेना) आणि श्री. मनोहर पाटील (निवृत्त सुभेदार, भारतीय सेना) यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *