Monday , September 21 2026
Breaking News

विद्याभारती जिल्हास्तरीय स्पर्धा खो-खो स्पर्धेत शांतिनिकेतन, देवेंद्र जीनगौडा, संत मीरा गणेशपुर अंतिम फेरीत

Spread the love

 

बेळगाव : गणेशपुर हिंडलगा येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात संत मीरा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय खो -खो विविध गटात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापुर, देवेंद्र जिंनगौडा स्कूल शिंदोळी, संत मीरा स्कूल गणेशपुर याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून संत मीरा इंग्रजी शाळा गणेशपुर हिंडलगा शाळेचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार गोवेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील, चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, क्रीडा शिक्षक श्रीकांत कांबळे, शुभांगी काकतकर, शिवकुमार सुतार, गंगा गानीकोप्प, सागर कोलेकर, या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व नाणेफेक करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी स्वाती सावंत, शिवकुमार, पोर्णिमा बाळेकाई, सुजित नेरुलकर, सुरज देसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ.विजय गोवेकर यांनी खेळाडूंनी नेहमीच सराव सकस आहार केल्यास शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक संतुलन स्थिर राहते व खेळामध्ये मनचिंतन होते त्यातून यशाला गवसणी मिळते त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे व पालकांच्या अज्ञात राहून अभ्यास व खेळात यश संपादन करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर श्रीकांत कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *