Monday , September 21 2026
Breaking News

सीमाप्रश्नी महाजन आयोग अहवालच अंतिम; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे वक्तव्य

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाजन आयोगाचा अहवालच अंतिम असल्याची भूमिका मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत मांडली. सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हितांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव महानगरपालिकेत या संदर्भात ठराव मंजूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अनेक लोकप्रतिनिधींनीही या भूमिकेवर आक्षेप नोंदविला आहे.

या पत्रकार परिषदेला मंत्री सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, यु. टी. खादर, ईश्वर खंड्रे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *