बेळगाव : दुसऱ्याच्या घरासमोर येऊन जोरजोरात ओरडल्यामुळे एका तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना बेळगावातील हुदली गावात घडली. मुथण्णा गुडबली (२२) हा तरुण चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाला. काल मुथण्णा मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहून घरी परतत होता. दुचाकीवरून जात असताना आरोपीच्या घरासमोर जोरजोरात ओरडल्यामुळे ही …
Read More »भातकांडे हायस्कूलजवळ कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेचे दुर्लक्ष
बेळगाव : शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल जवळील नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून ताबडतोब हटवण्यात यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे. शहापूर येथील गजाननराव भातकांडे हायस्कूल नजीकच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याशेजारी स्थानिक रहिवाशांसह ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून कचरा फेकला जातो. या कचऱ्याची उचल …
Read More »गणेशपूरमधील वृद्ध व्यक्तीसाठी मदत; सुरेंद्र अनगोळकर फाउंडेशननचा पुढाकार
बेळगाव : गणेशपूर, सांभाजी नगर फर्स्ट क्रॉसजवळ, अरविंद शिरोले मागील चार दिवसांपासून रस्त्याच्या कडेला झोपले होते. स्थानिक व्यावसायिक महिला सरोजा अमित शिरोलकर गेल्या तीन दिवसांपासून त्याना भोजन आणि त्याची काळजी घेत होते. तथापि, आज सकाळपासून त्याचे आरोग्य अचानक ढासळले आणि मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली. त्यावेळी सरोजा शिरोलकर यांनी …
Read More »बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे शेतकरी महिला जखमी
बेळगाव : शहरी भागातील शहापूर, वडगाव, जूनेबेळगावसह इतर भागातून शेतकरी महिला शहापूर अनगोळ,वडगाव, धामणे, माधवपूर, येळ्ळूर शिवारात भांगलण, लावणीसाठी जात असतात. वडगाव ते येळ्ळूर, धामणे, यरमाळ मार्गे मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यामूळे परिवहन खात्यातर्फे येळ्ळूर रस्त्यावर सिध्दिविनायक मंदिर, बायपास, शहापूर-येळ्ळूर शिवार हद्द तसेच पोतदार पेट्रोल पंपाजवळ रितसर फलकही उभारलेत. …
Read More »गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही गणेशोत्सव भव्यतेने साजरा करू या. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. कुमार गंधर्व कला मंदिरात आयोजित गणेशोत्सवाच्या पुर्वतयारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्यापासून संगीत भजन स्पर्धा
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय ,बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे नववे वर्ष असून रविवार दि. 17 ते मंगळवार दि.19 ऑगस्ट 2025 या कालावधीत मराठा मंदिर येथे होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटात 19 आणि पुरुष गटात 12 अशा एकूण 31 …
Read More »इस्कॉनमध्ये जन्माष्टमी उत्साहात साजरी…
बेळगाव : इस्कॉन चळवळीतील दरवर्षीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. या उत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या महोत्सवात रविवारी जन्माष्टमी निमित्त भरगच्च कार्यक्रम झाले. जन्माष्टमी कथा महोत्सव गेल्या रविवारपासून इस्कॉनचे अध्यक्ष …
Read More »पंतवाड्यात पंत जन्माष्टमी मोठा उत्साहात साजरी
बेळगाव : समादेवी गल्लीतील श्री पंतवाडा येथे शनिवारी पंत जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. याप्रसंगी पहाटे श्री पंत घराण्याचे वंशज परमपूज्य रंजन पंत परमपूज्य राजन संजीव पंत, रोहन पंत, श्रीवत्स कुलकर्णी यांच्या हस्ते पंत जन्मोत्सवाची पूजा करण्यात आली. सकाळच्या सत्रात सकाळी पारंपरिक भजन, यमुनाक्का महिला मंडळाचे …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिक्षिका शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ
बेळगाव : शीतल बडमंजी यांच्या स्मरणार्थ विज्ञान कथाकथन स्पर्धा दिनांक ३० जुलै २०२५ रोजी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची मूल्ये जपावीत हाच या स्पर्धेचा मूळ उद्देश होता.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, ॲड. राजाभाऊ पाटील,शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, वि.गो.साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, …
Read More »शॉपिंग उत्सव प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
बेळगाव : “शाॕपिंग उत्सव सारखी प्रदर्शने यश इव्हेंट व कम्युनिकेशन्सनी आयोजित केल्याने बेळगावकरांना नवनव्या वस्तू व उपकरणे एकाच ठिकाणी पहायला व माफक दरात खरेदी करायला मिळतात तसेच स्टॉल धारकांना आपल्या व्यवसायातील विविध उत्पादनांची मांडणी करून ग्राहकां पर्यंत पोहोचता येते” असे मत उद्घाटक रोटरी क्लब बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta