Monday , April 20 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्यापासून संगीत भजन स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय ,बेळगाव या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे नववे वर्ष असून रविवार दि. 17 ते मंगळवार दि.19 ऑगस्ट 2025 या कालावधीत मराठा मंदिर येथे होणाऱ्या या स्पर्धेत महिला गटात 19 आणि पुरुष गटात 12 अशा एकूण 31 भजनी मंडळनी भाग घेतला आहे.
या स्पर्धांचे उद्घाटन रविवारी दुपारी 12 वा. ह भ प दत्तू जट्टेवाडकर बेळगाव यांच्या हस्ते होणार आहे. यंदाची ही स्पर्धा प्रथम महिला गट आणि नंतर पुरुष गट अशा पद्धतीने घेतली जाणार आहे.
पहिल्या दिवशी दैवज्ञ महिला भजनी मंडळ शहापूर, श्री मंगाई महिला भजनी मंडळ वडगाव, मुक्त ग्रुप महिला भजनी मंडळ टिळकवाडी, संत मुक्ताई महिला भजनी मंडळ भारतनगर, ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळ मन्नूर, विठू माऊली महिला भजनी मंडळ बसुरते, श्री महालक्ष्मी सांप्रदायिक महिला भजनी मंडळ केदनूर, भक्ती सांस्कृतिक महिला भजनी मंडळ बापट गल्ली, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ किणये, जय सातेरी महिला भजनी मंडळ, करंजगाव ता. चंदगड, जय हरी महिला भजनी मंडळ राजहंसगड आणि श्री माता अन्नपूर्णेश्वरी दैवज्ञ महिला भजनी मंडळ शहापूर असे बारा भजनी मंडळ आपली कला सादर करणार आहेत.
सर्व बारा भजनी मंडळांनी दुपारी बारा वाजता मराठा मंदिर येथे उपस्थित रहावे. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भजनांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सार्वजनिक वाचनालयतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *