बेळगाव : बेळगाव जिल्हा जिम ओनर्स असोसिएशन यांच्यावतीने आज रविवार दि. 8 रोजी सर्वसाधारण बैठक शिवबसव प्लाझा फुलबाग गल्ली येथे घेण्यात आली. संस्थापक किरण कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत मागील वर्षांतील जमाखर्च सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे एकमताने नवीन कमिटीची निवड करण्यात आली. नवीन कमिटी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी चेतन ताशीलदार तर …
Read More »यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो : सचिन शिंदे यांचे प्रतिपादन
मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा चंदगड : “आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेणं गरजेचं आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळालेलं यशच खऱ्या अर्थाने टिकतं आणि जीवनाला दिशा देतं,” असे स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सचिन शिंदे यांनी व्यक्त केले. …
Read More »दिवंगत शीतल बडमंजी यांची श्रद्धांजलीपर शोकसभा 9 रोजी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनच्या जेष्ठ शिक्षिका, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व, शीतलताई बडमंजी यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांच्या निधनाच्या शोक प्रित्यार्थ सोमवार दिनांक ९ जून रोजी सायं. ४.३० वा. मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, मराठी विद्यानिकेतन, मराठा …
Read More »ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांची केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेला भेट
बेळगाव : एम. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल आणि पीजी रिसर्च सेंटर, बेळगाव येथील संशोधन अभ्यासकांच्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच मराठा मंडळच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेतील अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. या भेटीचा उद्देश प्रयोगशाळेतील सुविधांचा शोध घेणे, चालू संशोधन प्रकल्पांबद्दल जाणून घेणे आणि सहकार्याच्या संधी वाढवणे हा होता. भेटीदरम्यान, संशोधन …
Read More »सौंदत्ती यल्लमा डोंगरावरील पायाभूत सुविधांची विकास कामे त्वरित सुरू करा : मंत्री एच. के. पाटील यांची सुचना
बेळगाव : दरवर्षी लाखो भाविकांची आराध्य देवता असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवस्थान येथील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना,कायदा, संसदीय कामकाज, कायदे आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बेळगावला आलेल्या मंत्री एच के पाटील यांनी,आज शुक्रवारी यल्लमा डोंगरावरील व्यापक विकास आराखड्यासंदर्भात बैठक बोलावली होती. …
Read More »बकरी ईदनिमित्त कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या गायींची सुटका!
बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलखान्यात नेण्यासाठी जमा केलेल्या गायींची गोरक्षकांनी सुटका केल्याची घटना बेळगावात घडली आहे. बकरी ईदमुळे गायींना कत्तलखान्यात नेण्यासाठी एकत्र केले जात असल्याची माहिती मिळताच, गोरक्षक मारुती सुतार यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या इतर कार्यकर्त्यांसह गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत नेले. देशात गोतस्करी आणि …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ६जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.दरवर्षी ६ जून रोजी हा सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २०२५ मध्ये ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नाचा विजयोत्सव आहे. या दिनाचे औचित्य साधून …
Read More »एमएसडीएफचे फुटबॉलपटू बँकॉकला रवाना
बेळगाव : बँकॉक इंटरनॅशनल फुटबॉल स्पर्धा सुपर कप-२०२५ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होणाऱ्या बेळगाव शहरातील मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या (एमएसडीएफ) संघातील खेळाडूंना जर्सी वितरणासह शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील एका तारांकित हॉटेलमध्ये गेल्या मंगळवारी आयोजित सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजु) …
Read More »बेळगावात पीओपी गणेशमूर्त्यांवर निर्बंध?
बेळगाव : कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या सूचनेनुसार, यावर्षी बेळगावात पीओपी आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारे रंग वापरून तयार केलेल्या गणेश मूर्तींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा बेळगाव महानगरपालिकेने दिला आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, बंगळूरुच्या निर्देशानुसार, पीओपीपासून बनवलेल्या आणि …
Read More »बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
बेळगावात भाजपच्यावतीने आंदोलन बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरू येथे विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेला पुर्णतः राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार असल्याने त्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आज बेळगाव भाजपने तीव्र आंदोलन केले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta