Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

अथणी येथील लॉजमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक

  अथणी : अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीतील प्रशांत हॉटेल अँड लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी लॉज मालकासह दोघांना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लॉज मालक सरदार भगवंत कांबळे हा महिलेच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती …

Read More »

महिला आरक्षण विधेयकाविरोधात बेळगावात संताप

  बेळगाव : बेळगावमध्ये आज नारी मंचतर्फे ३३ टक्के नारी शक्ती आरक्षण विधेयकाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. विविध समाजघटक आणि संघटनांतील महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत या विधेयकाचा निषेध नोंदवला. या कार्यक्रमात विद्या पाटील, प्रिया पुराणिक आणि आशा यमकनमर्डी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांचे हक्क, राजकीय प्रतिनिधित्व …

Read More »

श्री बसवेश्वर जयंतीनिमित्त उद्या शहरातील वाहतूक मार्गात बदल

  बेळगाव : विश्वगुरू श्री बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त उद्या रविवार दि. 26 एप्रिल 2026 रोजी शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीप्रसंगी सार्वजनिकांना अनुकूल व्हावे यासाठी नेहमीच्या वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आला असून याची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन शहर पोलीस आयुक्तांनी केले आहे. श्री बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त उद्या रविवारी बेळगाव शहरात …

Read More »

शाहबाज हत्या प्रकरणी चौघांना जन्मठेप

  बेळगाव : बेळगावमधील नेहरू नगर येथे २०२० मध्ये झालेल्या शाहबाज हत्या प्रकरणी आज जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. शाहबाजची हत्या आणि अर्फान याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने चार जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या या घटनेबाबत बेळगावच्या द्वितीय जिल्हा आणि सत्र न्यायालयात …

Read More »

कष्ट शिक्षकांचे… श्रेय अधिकाऱ्यांचे; निकालानंतर शिक्षण खात्यात ‘श्रेय युद्ध’

  वर्षभर विद्यार्थ्यांसाठी झटलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी; काही अधिकाऱ्यांचे फ्लायर्स सोशल मीडियावर व्हायरल बेळगाव (प्रतिनिधी) : यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांचा निकाल समाधानकारक लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना शिक्षण विभागात मात्र निकालाचे श्रेय घेण्यावरून अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. वर्षभर विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या कष्टावर …

Read More »

शिक्षक की ‘ऑल-इन-वन’ सरकारी कर्मचारी? बेळगावात शिक्षण दुय्यम ठरण्याची भीती

  बेळगाव : शिक्षक म्हणजे शिक्षणाची जबाबदारी पार पाडणारा कणा; पण सध्या बेळगाव जिल्ह्यातील शिक्षक अनेक प्रशासकीय कामांच्या ओझ्याखाली अक्षरशः गुदमरू लागले आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच जनगणना, निवडणूक कामे, बीएलओ, विविध सर्वेक्षणे आणि आता एस एस एल सी निकाल तयार करण्याची जबाबदारी अशी अनेक कामे त्यांच्या माथी मारण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र …

Read More »

बेळगावमध्ये ओढ्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यात यश

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बंबरगा गावाजवळ ओढ्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या हेल्पलाइन रेस्क्यू टीमने अत्यंत कमी वेळात मृतदेह पाण्याबाहेर काढून शोधमोहीम फत्ते केली. आज दुपारी १२ च्या सुमारास बंबरगा गावाजवळील ओढ्यात करगुप्पी येथील रहिवासी बसवराज मारुती माळगी हे पडल्याची माहिती पोलीस …

Read More »

शहरातील 11 घरफोडी प्रकरणात पाच जणांना अटक; 67.9 लाखांचे दागिने जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरातील 11 घरफोडी प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील सुमारे 67.9 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली. बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हनुमाननगर, …

Read More »

श्रीराम सेना हिंदूस्थान आयोजित “बेळगाव हिंदकेसरी” पर्व तिसरे बैलगाडा शर्यतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित बेळगाव हिंदकेसरी किताबाच्या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन सोहळा आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या उद्घाटनप्रसंगी अनगोळ गावातील शेतकरी बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी मरगाई मंदीर येथे देवाची विधिवत पूजा करण्यात आली. …

Read More »

मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने कलमेश्वर हायस्कूलच्या शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

  मण्णूर : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर यांच्या वतीने कलमेश्वर हायस्कूल, मण्णूरचा दहावीचा निकाल 100 टक्के लागल्याबद्दल शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. भरत चौगुले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत सोसायटीच्या उपक्रमांची माहिती दिली. यानंतर कलमेश्वर हायस्कूलमधील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन …

Read More »