Tuesday , August 18 2026
Breaking News

म. ए. समितीच्या महामोर्चाला परवानगी देऊ नका; करवेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगावमध्ये २२ जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित महामोर्चाला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देऊ नये, अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (टी. ए. नारायणगौडा गट) कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी बोलताना दीपक गुडगनट्टी यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती विविध बैठका घेऊन मराठी भाषिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. २२ जूनच्या महामोर्चाला प्रशासनाने परवानगी दिल्यास बेळगावमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

तसेच शुभम शेळके यांच्यावर कारवाई करून त्यांना राज्याबाहेर हद्दपार करावे आणि महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी समिती प्रतिनिधींना चर्चा करून प्रश्न मांडण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी मोर्चाचा निर्णय कायम ठेवला असल्याचा आरोप करवेकडून करण्यात आला.

दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्याची माहिती दिली. त्यांनी शांततेत आपली भूमिका मांडावी, तसेच रस्ते वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही संघटनांची संयुक्त बैठक झालेली नसून, लवकरच उभयभाषिकांची बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

या आंदोलनात सुरेश गवन्नावर यांच्यासह कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा; खड्डेमय रस्ते, बंद गाळे अन् निकृष्ट कामांचा पाढा : रमाकांत कोंडुसकरांचा लोकप्रतिनिधींवर घणाघाती हल्ला

Spread the love  बेळगाव : विकासाच्या नावाखाली बेळगावकरांची दिशाभूल आणि फसवणूक सुरू आहे. कोट्यवधींचा निधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *