Monday , August 17 2026
Breaking News

मराठी भाषा प्रेरणा मंच व मराठी भाषा प्रेमी संघटनेकडून मराठी माध्यमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंच, या मराठी भाषा प्रेमी संघटनेकडून दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
बेळगाव येथील विद्यानिकेतनच्या सभागृहात रविवार दिनांक 21- 6- 2026 रोजी सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या समारंभात बेळगाव शहरातील गुणाानुक्रमे पहिले 10 विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणांनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी, आणि खानापूर तालुक्यातील गुन्हा अनुक्रमे पहिले 10 विद्यार्थी, असे एकूण 30 विद्यार्थी पण समान गुण घेतलेले अनेक विद्यार्थी आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मिळून 45 गुणी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
प्रत्येक विभागातील पहिल्या क्रमांकाला दहा हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला चार हजार रुपये अशी एकूण एक लाखाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय पाणी पुरवठा खात्याचे निवृत्त कार्यकारी अभियंता शशिकांत नाईक हे सुध्दा निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांला गणित किंवा विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
‌‌ याशिवाय बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील ज्या मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, अशा शाळांच्या मुख्याध्यापकांचाही या सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय एक उत्कृष्ट शाळा निवडून, त्या शाळेला ‘महात्मा फुले आदर्श शाळा’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवून विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मी यश कसे साध्य केले? या सत्रात यशस्वी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद.यानंतर दहावी नंतरच्या पाऊलवाटा, यामध्ये मुंबई येथील आय.आय.टी.चे प्रा. डॉ. गोपाळ पाटील, हे विद्यार्थी व पालकांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंच, यांच्यावतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *