Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

श्री चांगळेश्वरी हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

  येळ्ळूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर, संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळूरमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक व सहाय्यक शिक्षक एन. वाय. मजूकर व शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांच्या हस्ते शाळेच्या आवारात विविध वनस्पतींचे रोपण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण दिनाचे महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी …

Read More »

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “इ-वेस्ट” जनजागृती रॅलीचे आयोजन

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जुन रोजी बेळगाव येथील रामनगर परीसरात घरोघरी आणि खानापूर येथील बाजारपेठेतील दुकानात जाऊन मराठा मंडळ कॉलेज आँफ फार्मासी बेळगाव या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी इ -वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) याबाबत जनजागृती करून इ-वेस्ट गोळा केलं. यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती शैक्षणिक उपक्रम २०२५

  बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे मातृभाषेतील शाळेत प्रवेश घेऊन मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागातील सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. मागील ८ वर्षे हा उपक्रम सलग सुरू असून २०२५ साली सुद्धा सीमाभागातील सर्व मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या १लीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगांव परिवारच्या जायंट्स ग्रुपतर्फे विशेष वृक्षारोपण उपक्रम

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे युद्ध स्मारक गार्डन, हिंदवाडी, बेळगाव येथे एक विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. केवळ २ तासांमध्ये ३५ हून अधिक रोपे लावण्यात आली. खड्डे खोदणे आणि झाडे लावण्याचे सर्व काम सदस्यांनी स्वतः उत्साहाने पार पाडले. सार्वजनिक जनजागृतीसाठी बॅनर्सच्या माध्यमातून संदेश …

Read More »

चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी : प्रमोद मुतालिक

  बेळगाव : बेंगळुरू येथील आर.सी.बी. विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागितल्यास तो मोठा गुन्हा ठरणार नाही, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मुतालिक म्हणाले की, आर.सी.बी.च्या विजयाच्या जल्लोषात घडलेली ही दुर्घटना …

Read More »

अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी हिंदु संघटनांची मागणी

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या …

Read More »

माजी सैनिक संघटना आणि रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना फेडरेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्यायालय परिसरात पर्यावरण जागृती आणि मोफत रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करून मोफत रोपे वाटण्यात आली. यावेळी वनसंवर्धन करून देश …

Read More »

मराठा लाईट इन्फंट्रीत ६५९ अग्निवीर जवानांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पाचव्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर गेल्या ३१ आठवड्यांपासून लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या ६५९ अग्निवीर जवानांचा दीक्षांत संचलन सोहळा आज गुरुवारी पार पडला. यावेळी जवानांनी शानदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक शिक्षिका शामला चलवेटकर उपस्थित होत्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे …

Read More »

मिरज माहेर मंडळात पर्यावरण दिन साजरा…

  बेळगाव : मिरज माहेर मंडळात जुनच्या मासिक बैठकीत शोभा लोकूर यांच्या सोमवार पेठ निवासस्थानी नुकताच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पाहुण्या म्हणून पर्यावरण व बाग प्रेमी दीपा देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडळात त्यांचे अध्यक्ष अस्मिता आळतेकर व सेक्रेटरी दीपा बापट यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. …

Read More »