बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शनिमंदिर, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील लोकांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्याआधी खासदार शेट्टर यांनी शनिमंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेतले. पूजा-आरती झाल्यानंतर ‘जनहित साधण्याची शक्ती दे, सर्वांवर …
Read More »अवैधरित्या वाहतूक होणारी २.७३ कोटी रुपये जप्त
बेळगाव : बेळगाव माळमारुती पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करून महाराष्ट्रातील सांगली ते हुबळी येथे मालवाहू वाहनातून अवैधरित्या वाहतूक केलेली २.७३ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. सचिन मेनकुदळे, सांगली, महाराष्ट्र आणि मारुती मरगुडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे …
Read More »उद्योजक गोविंद टक्केकर यांच्याकडून देसूर गावात पाणी पुरवठा
बेळगाव : पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने देसूर (ता. जि. बेळगाव) गावच्या मदतीला उद्योजक गोविंद टक्केकर धाऊन गेले असून त्यांनी गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस अद्याप समाप्त झालेले नसताना बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा बेळगाव तालुक्यात पावसाने …
Read More »जुगारी अड्ड्यावर छापा : 12 जण गजाआड; 4.81 लाख जप्त
बेळगाव : मुत्नाळ (ता. बेळगाव) गावाजवळील एका शेडवर गेल्या मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री छापा टाकून सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 12 जुगार यांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील 4 लाख 81 हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे शहाबाद खादीरसाब तिगडी, रियाज हुसेनसाब पटेल (दोघेही रा. …
Read More »बेळगाव मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग – स्थायी समितीची बैठक
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीतील स्मशानभूमींमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या. शुक्रवारी बेळगाव महापालिकेच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते होते. बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीतील वीज बेटाच्या समस्येबाबत …
Read More »काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल स्कूल जवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हौसूर आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात …
Read More »उद्योजक संतोष पद्मन्नावर खून प्रकरणी नवा ट्विस्ट!
बेळगाव : बेळगावच्या संतोष पद्मन्नावर या उद्योजकाच्या मृत्यूप्रकरणी दररोज नवनव्या खळबळजनक बातम्या उघडकीस येत असून संतोष पद्मन्नावर हा वासनांध होता आणि त्याच सवयीमुळे पत्नीने त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या खूनप्रकरणी पत्नी उमा पद्मन्नावरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले खरे. परंतु यामागे असलेल्या कारणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. …
Read More »म्हादई योजना १५ दिवसांत लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, नरगुंद महिला संघर्ष राज्य समितीच्या वतीने म्हादई योजना राबविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज अभिनव आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी कळसा भांडुरा प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी बेळगावच्या कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करण्यात आले. उत्तर …
Read More »जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर तर उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार यांची निवड
कार्यवाहपदी महेश काशिद, सहकार्यवाहपदी परशराम पालकर बेळगाव : जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्षपदी सुहास हुद्दार, कार्यवाहपदी महेश काशिद तर सहकार्यवाहपदी परशराम पालकर यांची बिनविरोध निवड झाली. कुलकर्णी गल्ली येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. मावळते अध्यक्ष विलास अध्यापक अध्यक्षस्थानी होते. मावळते कार्यवाह …
Read More »गणेश दूध केंद्राचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव : उचगाव क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राचा १० वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १९) दुपारी १२ वाजता होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा कार्यक्रम केंद्रात आयोजित केला आहे, अशी माहिती गणेश दूध केंद्राचे संचालक प्रवीण ऊर्फ उमेश देसाई यांनी दिली. गणेश दूध अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस आले आहे. १० …
Read More »