बेळगाव : बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून बेळगावच्या कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात एका सिंहिणीला आणण्यात आले आहे. 6 फेब्रुवारी रोजी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात निरुपमा नावाच्या सिंहिणीचा आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे कृष्ण नावाचा सिंह एकाकी पडला. काल रविवारी बेंगळुरूच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून या सिंहिणीला भुतरामनहट्टीची येथील प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बुधवारी बैठक
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किनेकर माजी आमदार यांनी केले आहे.
Read More »ज्योतिर्लिंग देवस्थान बेळगाव येथे 3 एप्रिल रोजी कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी जोतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जोतिबाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तसेच केदार ग्रंथाचे पठण करण्यात येणार असून बारा वाजता आरती करून तीर्थप्रसाद वाटप होणार आहे.त्यानंतर जोतिबा देवाचा जप करण्यात येणार …
Read More »बेळगाव साहित्य संमेलनात शाहिर अभिजित कालेकर यांचा ‘जागर लोक संस्कृतीचा’ कार्यक्रम रंगणार
बेळगाव : ६वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. या संमेलनात शाहीर अभिजीत कालेकर लिखित ‘जागर लोक संस्कृतीचा’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार असून, तो रसिकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. लोक संस्कृती नाट्य कला संस्था, खानापूर-बेळगाव …
Read More »बेळगाव ग्रामीण भागात विकासाचा नवा अध्याय : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्याअंतर्गत रस्ते, शाळा, समाजभवन आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील धामणे (एस) येथील सरकारी मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या दोन अतिरिक्त …
Read More »बेळगाव शहर परिसरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी
बेळगाव : आज सोमवारी देशभरात ईद साजरी केली जात असून बेळगावमधील मुस्लिम बांधवांकडून देखील रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला गेला. त्या अनुषंगाने आज सकाळी सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रमही पार पडला. रमजान ईद निमित्त आज पहाटेपासूनच शहर उपनगरातील मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचे नमाज पठण करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील …
Read More »क्षुल्लक कारणामुळे दोन गटात हाणामारी…
बेळगाव : बेळगावातील कृष्णा देवराय सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये क्षुल्लक कारणावरून एकाच समाजातील दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे. जेवणाच्या वेळी एकमेकांच्या पायाला पाय लागल्याने दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन त्यांच्यात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट …
Read More »युवा समिती सिमाभाग पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग यांच्या वतीने चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेण्यात आली. युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना प्रशासनाने हद्दपारची नोटीस बजावली आहे, तरी या दडपशाहीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारने आवाज उठवावा यासाठी यासाठी आमचा निरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवा …
Read More »भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आठवड्यात; ४ जणांच्या नावाची चर्चा
नवी दिल्ली : भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष याच आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी कोणा-कोणाच्या नावाची चर्चा होत आहे त्यांची नावे देखील …
Read More »दुकान लावण्यावरून भांडण; एकाने दुसऱ्याचे नाक कापले..
बेळगाव : बेळगाव शहरातील खाडे बाजार येथील खंजर गल्ली येथे फूटपाथवर दुकान लावण्यावरून झालेल्या गदारोळाचे रूपांतर हाणामारीत झाले असून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराचे नाक कापल्याची घटना घडली आहे. पीडित सुफियान पठाण (४२) हे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना, अयान देसाई या दुकानदाराशी बाचाबाची झाली. यावेळी देसाई यांनी चाकू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta